खर्डा येथे कोयत्याने वार करून करण्यात आलेल्या तान्हाजी भास्कर बोराडे यांच्या खून प्रकरणाचा स्थानिक गुन्हे शाखेने उलगडा केला आहे. या प्रकरणात एका १८ वर्षीय आरोपीसह तीन विधीसंघर्षित बालकांना ताब्यात घेण्यात आले आहे.

११ सप्टेंबर रोजी तान्हाजी भास्कर बोराडे, रा. माळेवाडी, ता. भूम, जि. धाराशिव यांच्यावर मोटारसायकलवरून आलेल्या अनोळखी इसमांनी डोळ्यात मिरची पावडर टाकून कोयत्याने वार केला होता. या हल्ल्यात त्यांचा मृत्यू झाला. याप्रकरणी खर्डा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला.

स्थानिक गुन्हे शाखेने गोपनीय माहिती आणि तांत्रिक विश्लेषणाच्या आधारे तपास करत प्रसाद अशोक अडागळे, वय १८, रा. टाकळीमिया, ता. राहुरी याच्यासह १६ आणि १७ वर्षांच्या तीन विधीसंघर्षित बालकांना ताब्यात घेतले. यातील एका आरोपीचा पुणे येथे शोध घेण्यात आला. सर्वांना तपासासाठी खर्डा पोलीस ठाण्यात हजर करण्यात आले असून, पुढील तपास खर्डा पोलीस करीत आहेत.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *