• अविनाश पाटील यांचा विद्यापीठाकडून गौरव
  • दैनिक वेतनिक पुरस्कार २०२५ प्रदान
  • शैक्षणिक प्रशासनातील योगदानाची दखल
  • कुलगुरूंच्या हस्ते पुरस्काराचे वितरण
  • मान्यवरांच्या उपस्थितीत पुरस्कार सोहळा
  • पुरस्काराबद्दल सर्वत्र कौतुक

Thumbnail Title :
अविनाश पाटील यांचा मोठा सन्मान!


JALGAON | यावल तालुक्यातील उंटावद येथील रहिवासी अविनाश चंद्रकांत पाटील यांना कवयित्री बहिणाबाई चौधरी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठ, जळगावमार्फत दैनिक वेतनिक पुरस्कार २०२५ प्रदान करण्यात आला.

सामान्य प्रशासन विभागामार्फत लोकाभिमुख वृत्तीने शैक्षणिक प्रशासन व सेवा या क्षेत्रात केलेल्या उल्लेखनीय योगदानाबद्दल हा पुरस्कार देण्यात आला. कुलगुरू डॉ. व्ही.एल. माहेश्वरी आणि पुणे विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. सुरेश व्ही. गोसावी यांच्या हस्ते अविनाश चंद्रकांत पाटील यांना पुरस्कार प्रदान करण्यात आला. यावेळी प्र. कुलगुरू एस.टी. इंगळे, कुलसचिव डॉ. विनोद पाटील, परीक्षा नियंत्रक डॉ. योगेश पाटील, सौ. इंदुबाई चंद्रकांत पाटील आणि प्रशांत प्रमोद पाटील यांच्यासह मान्यवर उपस्थित होते. अविनाश पाटील यांना मिळालेल्या या पुरस्काराबद्दल त्यांचे सर्वत्र कौतुक होत आहे.

एनटीव्ही न्यूज मराठी | यावल

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *