डीजेच्या कर्णकर्कश आवाजामुळे होणाऱ्या ध्वनिप्रदूषणाविरोधात आवाज उठवणारे सामाजिक कार्यकर्ते विद्यानंद बापट यांना मारहाण झाल्याच्या निषेधार्थ बीडमध्ये आंदोलन करण्यात आले.
तसेच सामाजिक कार्यकर्ते संतोष पंडित यांच्या अटकेविरोधातही जिल्हाधिकारी कार्यालयासमोर निदर्शने करण्यात आली.
डॉ. गणेश ढवळे यांच्या नेतृत्वाखाली हे आंदोलन करण्यात आले. यावेळी विद्यानंद बापट यांना झालेल्या मारहाणीच्या प्रकरणाची तसेच संतोष पंडित यांच्या अटकेची निष्पक्ष चौकशी करावी, अशी मागणी आंदोलकांनी केली.
तसेच सामाजिक कार्यकर्त्यांवरील कारवाईचा फेरविचार करावा, अशी मागणीही यावेळी करण्यात आली.
