बीड येथे १२ सप्टेंबर २०२६ रोजी आयोजित ‘जल्लोष लोककलेचा २०२६-२७’ या स्पर्धेत साने गुरुजी निवासी प्राथमिक विद्यालय, केजच्या विद्यार्थ्यांनी उल्लेखनीय यश संपादन केले. दिंडी नृत्यात तृतीय क्रमांकासह लोकगीत गायनात उत्तेजनार्थ पारितोषिक मिळवले.
बालरंगभूमी परिषद, मुंबई यांच्या वतीने आयोजित या स्पर्धेत विद्यालयाच्या संघाने पारंपरिक दिंडी नृत्य सादर केले. या सादरीकरणाने उपस्थितांची मने जिंकली. तसेच ‘चैत्र पौर्णिमेची रात’ हे लोकगीत सादर करून संघाने उत्तेजनार्थ पारितोषिक मिळवले.
दिंडी नृत्याचे दिग्दर्शन कु. साक्षी कराड, कुलकर्णी मॅडम आणि श्रीमती शेख मॅडम यांनी केले. श्री. जाधवर सर यांचे विद्यार्थ्यांना मार्गदर्शन व सहकार्य लाभले. या यशाबद्दल संस्थाध्यक्ष ॲड. उद्धव कराड, उपाध्यक्ष राजेश कापसे सर आणि प्राचार्य डॉ. कविता गिते-कराड यांनी विद्यार्थी, मार्गदर्शक व शिक्षकांचे अभिनंदन करून पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या.
