गणेशोत्सवात पर्यावरण संवर्धन आणि प्रदूषणाला आळा घालण्यासाठी गायीच्या शेणापासून तयार करण्यात आलेल्या गणेशमूर्तींना यंदा चांगली मागणी आहे. अहिल्या गोशाळेतील दिव्यांगांनी या पर्यावरणपूरक गणेशमूर्ती साकारल्या आहेत.

या मूर्तींवर कोणत्याही रासायनिक रंगांचा वापर न करता नैसर्गिक रंगांचा वापर करण्यात आला आहे. प्लास्टर ऑफ पॅरिसच्या मूर्तींमुळे होणारे जलप्रदूषण आणि पर्यावरणावरील परिणाम लक्षात घेता अनेक भाविक पर्यावरणपूरक गणेशमूर्तींना पसंती देत आहेत.

गायीच्या शेणापासून तयार केलेल्या या मूर्ती विसर्जनानंतर पर्यावरणाला हानी पोहोचवत नसल्याचे सांगण्यात येत आहे. पारंपरिक गणेशोत्सवाला पर्यावरण संवर्धनाची जोड देणाऱ्या या उपक्रमाचे नागरिकांकडून कौतुक होत आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *