नाशिकच्या येवला शहरात घर स्थलांतराचा अनोखा प्रयोग सुरू आहे. रस्त्याच्या कामात अडथळा ठरणारे घर पाडण्याऐवजी ते सुरक्षितपणे दुसऱ्या ठिकाणी हलवण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.

उद्योजक सम्राट वर्मा यांच्या घराचे तब्बल अडीचशे जॅकच्या मदतीने हळूहळू उचलण्याचे काम सुरू आहे. या अनोख्या कामासाठी हरियाणातील कुरुक्षेत्र येथील अनुभवी कारागिरांना बोलावण्यात आले असून, दहा मजुरांच्या मदतीने घर उचलले जात आहे.

संपूर्ण घर स्थलांतरित करण्यासाठी जवळपास एक महिन्याचा कालावधी लागणार असल्याचे सांगण्यात येत आहे. येवल्यात अशा प्रकारचा हा पहिलाच प्रयोग असल्याचा दावा केला जात असून, घर स्थलांतर पाहण्यासाठी नागरिकांमध्येही उत्सुकता आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *