♦️ सावखेडा सिममधून सोळा तरुण पायी रवाना
♦️ प्रसिद्ध अजमेर तीर्थक्षेत्राकडे पायी प्रवास
♦️ मशिदीजवळून युवकांनी यात्रेला केले प्रस्थान
♦️ परिसरातील सोळा युवक यात्रेत सहभागी
♦️ दुष्काळाचे सावट दूर होण्यासाठी करणार प्रार्थना
♦️ तालुक्यासाठी युवकांनी केला विशेष निर्धार

JALGAON | यावल तालुक्यातील सावखेडा सिम आणि परिसरातील एकूण १६ तरुण प्रसिद्ध तीर्थक्षेत्र अजमेर येथे पायी रवाना झाले आहेत. १ ऑक्टोबर रोजी सावखेडा सिम येथील मशिदीजवळून या युवकांनी पायी यात्रेला सुरुवात केली.

अजमेरकडे पायी रवाना झालेल्या युवकांमध्ये रज्जाक मुबारक तडवी, जावेद लतीफ तडवी, जुम्मा नबाब तडवी, कुर्बान अकबर तडवी, जुम्मा बिस्मिल्ला तडवी, सत्कार नजीर तडवी, शरीफ निजाम तडवी, समीर हबीब तडवी आणि राजू हमीद तडवी यांचा समावेश आहे.
तसेच हंबर्डी येथील नूर मोहम्मद युसूफ खान तडवी, हसन बलदार तडवी, हसीन राजू तडवी, मलिक हसन तडवी, वसीम किताब तडवी, सातोद येथील दत्तात्रय तळले आणि हिंगोणा येथील भागवत पंढरीनाथ धनगर हेही या पायी यात्रेत सहभागी झाले आहेत.
या युवकांनी अजमेर तीर्थक्षेत्री पोहोचून आपल्या यावल तालुक्यावरील दुष्काळाचे सावट दूर व्हावे, यासाठी प्रार्थना करण्याचा निर्धार केला आहे.

एनटीव्ही न्यूज मराठी | यावल, जळगाव

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *