♦️ किनगावच्या कृती समितीचा मुंबई दौरा
♦️ अरबी समुद्रातील शिवस्मारकासाठी पाठपुरावा सुरू
♦️ अध्यक्ष मोहन पाटील यांच्या नेतृत्वात पाहणी
♦️ मनोज जरांगे पाटील यांची घेतली भेट
♦️ मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्र्यांना निवेदन सादर
♦️ शिवस्मारकाच्या कामाला गती देण्याची मागणी
JALGAON | जळगाव जिल्ह्यातील यावल तालुक्यातील किनगाव येथील छत्रपती शिवाजी महाराज शिवस्मारक कृती समितीने अरबी समुद्रातील शिवस्मारकाच्या कामाला गती मिळावी, यासाठी पाठपुरावा सुरू केला आहे. समितीचे अध्यक्ष मोहन रमेश पाटील यांच्या नेतृत्वाखाली मुंबई दौरा करून स्मारकाच्या जागेची पाहणी करण्यात आली.
मुंबईतील अरबी समुद्रात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते भूमिपूजन झालेल्या छत्रपती शिवाजी महाराजांच्या जागतिक स्मारकासाठी किनगाव येथील शिवस्मारक कृती समितीने पुढाकार घेतला आहे.
अध्यक्ष मोहन रमेश पाटील यांच्या नेतृत्वाखाली समितीने मुंबई दौरा केला आणि स्मारकाच्या जागेची पाहणी केली. या दौऱ्यादरम्यान समितीच्या सदस्यांनी मनोज जरांगे पाटील यांची भेट घेतली.
तसेच मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे, सुनेत्रा पवार आणि खासदार सुनील तटकरे यांना मंत्रालयात निवेदन देण्यात आले. अरबी समुद्रातील छत्रपती शिवाजी महाराजांच्या जागतिक स्मारकाच्या कामाला गती देण्यात यावी, ही प्रमुख मागणी यावेळी करण्यात आली.
या मोहिमेत पंकज हिवराळे, रोहित पाटील, बापू कुंभार, शेख युनूस, सर्फराज पिंजारी, अफजल तडवी यांच्यासह अनेक कार्यकर्ते उपस्थित होते.
एनटीव्ही न्यूज मराठी | यावल, जळगाव
