भुसावळ तालुक्यातील वरणगाव येथे आदिवासी तडवी भिल्ल समाज उन्नती मंडळ, ऑर्डनन्स फॅक्टरी यांच्या वतीने हजरत शेख अब्दुल कादिर जिलानी (र.अ.) यांच्या स्मरणार्थ गौस पाक ए आजम ११ वी शरीफ न्याज कार्यक्रम उत्साहात संपन्न झाला. यावेळी गुणवंत विद्यार्थी, समाजसेवक, मान्यवर आणि सेवानिवृत्त कर्मचाऱ्यांचा गौरव करण्यात आला. तसेच उमरा शरीफसाठी जाणाऱ्या कुटुंबाचाही सन्मान करण्यात आला.

रविवार, १८ ऑक्टोबर २०२६ रोजी झालेल्या या कार्यक्रमात समाजबांधवांनी मोठ्या उत्साहाने सहभाग घेतला. कार्यक्रमात इंजि. अनिल साहेब, डेप्युटी एक्झिक्युटिव्ह इंजिनिअर, यावल तथा त्रिमूर्ती फाउंडेशन, जळगाव; एमपीएससी परीक्षेत यश मिळवून पीएसआय पदासाठी निवड झालेले रौनक इस्माईल तडवी; कवी, लेखक व व्यावसायिक हुसेन रुबाब जमादार आणि सावखेडासीम येथील समाजसेवक असलम इब्राहिम यांचा सत्कार करण्यात आला.

सेवानिवृत्त कर्मचारी सलीम महेबूब तडवी आणि नूरजहान बाबू तडवी यांचाही गौरव करण्यात आला. इस्माईल तडवी व जावेद इस्माईल यांच्या उमरा शरीफसाठी जाणाऱ्या कुटुंबाचा विशेष सन्मान करण्यात आला.

गुणवंत विद्यार्थ्यांमध्ये रेहान राजू (सॉफ्टवेअर इंजिनिअरिंग, पुणे), अंजुम भिकारी (ई अँड टीसी इंजिनिअरिंग, पुणे), अनम मजीत (कॉम्प्युटर सायन्स इंजिनिअरिंग, पुणे), सना सरफराज (बीडीएस, सोलापूर), अमित सरफराज (एमसीए, छत्रपती संभाजीनगर) आणि नजमा राजेश (एलएलबी) यांचा समावेश होता. व्ही.पी.एल. विजेते नूर मोहम्मद जाफर, जाकीर हमीद आणि जावेद हमीद यांच्यासह अप्रेंटिस म्हणून कार्यरत शफिक अजित यांचाही गौरव करण्यात आला.

कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी फिरोज बिऱ्हाम, सलीम महेबूब, मजीद मेहबूब, भिकारी बशीर, नूर मोहम्मद जाफर, नवाज जहांगीर, सलीम सरदार, जावेद इस्माईल, राजू रमजान, मुबारक सिकंदर, फरीद तडवी, गफार चांदखा, सरफराज समशेर, सत्तार तडवी, दिलीप तडवी, असलम चांदखा, अक्रम बाबू, सागर भिकारी, फारुख अकबर, हमीद नबाब, सरफराज रमजान, याकूब इब्राहिम, मुस्तफा इस्माईल, सलीम इब्राहिम, आसिफ शब्बीर, आरिफ दगडू, आरिफ कलिंदर, राजेश मुसा, अहमद रुबाब, शकील बशीर आणि अजित महेबूब यांच्यासह ऑर्डनन्स फॅक्टरीतील कर्मचारी बांधवांनी परिश्रम घेतले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन नवाज जहांगीर यांनी केले, तर भिकारी बशीर यांनी आभार मानले.

या कार्यक्रमातून धार्मिक श्रद्धा, सामाजिक बांधिलकी आणि शैक्षणिक प्रगतीचा संदेश देण्यात आला.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *