जळगाव जिल्ह्यातील यावल तालुक्यातील चिंचोली येथील रहिवासी काशिनाथ दामोदर मोरे (वय ८८) यांचे शुक्रवार, दि. १३ रोजी सकाळी ९ वाजता अल्पशा आजाराने दुःखद निधन झाले.
त्यांची अंत्ययात्रा शनिवार, दि. १४ रोजी चिंचोली येथील राहत्या घरापासून निघणार आहे. त्यांच्या पश्चात चार मुले आणि मुली असा मोठा परिवार आहे. ते शरद मोरे, प्रमोद मोरे, अनिल मोरे आणि रितेश मोरे यांचे वडील होत.
