जळगाव जिल्ह्यातील यावल तालुक्यातील भालाशिव येथून दुःखद बातमी समोर आली आहे. ग्रामपंचायतीचे सेवानिवृत्त शिपाई राजमल तापीराम सपकाळे यांचे अल्पशा आजाराने निधन झाले. त्यांच्या निधनाने सपकाळे कुटुंबावर दुःखाचा डोंगर कोसळला आहे.

जळगाव जिल्ह्यातील यावल तालुक्यातील भालाशिव येथील ग्रामपंचायतीचे सेवानिवृत्त शिपाई राजमल तापीराम सपकाळे (वय ६०) यांचे १२ नोव्हेंबर रोजी अल्पशा आजाराने निधन झाले.

त्यांची अंत्ययात्रा शुक्रवार, दिनांक १३ नोव्हेंबर रोजी सकाळी ९ वाजता त्यांच्या राहत्या घरापासून काढण्यात आली. यानंतर त्यांच्यावर अंत्यसंस्कार करण्यात आले.

त्यांच्या पश्चात तीन मुलगे, दोन मुली आणि नातवंडे असा परिवार आहे. योगेश सपकाळे, प्रविण सपकाळे आणि ग्रामपंचायत शिपाई निलेश सपकाळे यांचे ते वडील होत.

राजमल तापीराम सपकाळे यांच्या निधनाने भालाशिव परिसरात हळहळ व्यक्त होत आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *