शेतकऱ्यांच्या हक्काच्या पैशांसाठी आमदार रणधीर सावरकर यांनी केलेल्या सातत्यपूर्ण पाठपुराव्याला अखेर यश आले आहे. अकोला जिल्ह्यातील सुकळी-नंदापूर येथील ५४ शेतकऱ्यांसाठी तब्बल दोन कोटी ८२ लाख रुपयांचा निधी प्राप्त झाला असून, लवकरच या अनुदानाचे वाटप होणार आहे.
अनेक वर्षांपासून प्रलंबित असलेल्या सुकळी-नंदापूर येथील शेतकऱ्यांच्या सानुग्रह अनुदानाचा प्रश्न अखेर मार्गी लागला आहे. संग्राहक तलावासाठी शेतकऱ्यांची जमीन सरळ खरेदीने किंवा खाजगी वाटाघाटीद्वारे संपादित करण्यात आली होती. २००६ ते २०१३ या कालावधीतील प्रकरणांमध्ये शासनाने हेक्टरी पाच लाख रुपये प्रमाणे सानुग्रह अनुदान मंजूर केले होते. मात्र, अनेक वर्षे शेतकऱ्यांना ही रक्कम मिळाली नव्हती.
शेतकऱ्यांनी आमदार रणधीर सावरकर यांच्याकडे हा प्रश्न मांडल्यानंतर त्यांनी तातडीने पाठपुरावा सुरू केला. जात-पात आणि धर्माचा विचार न करता, शेतकरी आणि मानवतेचा दृष्टिकोन ठेवून त्यांनी पाटबंधारे विभाग, विदर्भ पाटबंधारे विकास महामंडळ, नागपूर तसेच अर्थ विभागाकडे सातत्याने पाठपुरावा केला.
१७ जून २०२४ रोजी आमदार रणधीर सावरकर यांनी विदर्भ पाटबंधारे विकास महामंडळाला लेखी पत्र देऊन सुकळी-नंदापूरच्या शेतकऱ्यांचे सानुग्रह अनुदान प्राधान्याने वितरित करण्याची मागणी केली होती. मुरिजापूर आणि इतर भागांतील शेतकऱ्यांना अनुदानाचे वाटप झाले, मग सुकळी-नंदापूरच्या शेतकऱ्यांना ते का मिळाले नाही, असा सवालही त्यांनी उपस्थित केला होता.
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी या विषयाकडे लक्ष देत आमदार रणधीर सावरकर यांची मागणी मान्य केली. त्यानंतर विदर्भ पाटबंधारे विकास महामंडळ, नागपूर यांच्याकडून पाटबंधारे विभाग, अकोला यांना दोन कोटी ८२ लाख रुपयांचा निधी प्राप्त झाला आहे. या निधीचे ५४ लाभार्थी शेतकऱ्यांना लवकरच वाटप होणार आहे.
सानुग्रह अनुदानासाठी पात्र ठरलेल्या शेतकऱ्यांची नावे पुढीलप्रमाणे आहेत :
१. परमेश्वर जनार्दन साखरे
२. पुष्पाबाई जनार्दन साखरे
३. गोपिचंद पुरुषोत्तम शिरोळे
४. गोपाळ बडे इंगळे
५. विठ्ठल रामकृष्ण मुंडे
६. सावित्री लक्ष्मण वसू
७. शिवाजी दत्ताजी देसाई
८. देवलाल शालिग्राम सारसे
९. बाबुलाल शालिग्राम सारसे
१०. दिलीप शालिग्राम घाटोळे
११. ज्ञानेश्वर बळीराम छबिले
१२. शरद बळीराम छबिले
१३. गोपाळ गणेश काळे
१४. नितीन शिवदास शिराळे
१५. सरस्वतीबाई सदाशिव वडनारायण
१६. सुधाकर महादेव वाकडे
१७. बाबन दयालु सारसे
१८. देवलाल बाबन सारसे
१९. हरीश ज्ञानराम काळे
२०. रमेश पुंडलिकराव पवार
२१. सुभाष महादेव वाकडे
२२. रामदास महादेव वाकडे
२३. विठ्ठल मिमराव सारसे
२४. अनिता हरिदास उपराट
२५. नागोराव आकाशराम उपराट
२६. ज्योती प्रमोद इंगळे
२७. अशोकदास बोरडाराम लोणम
२८. गजानन शालिग्राम सारसे
२९. गंगुबाई गोविंदराव साळुंखे
३०. लक्ष्मी सुदाम टाकसाळ
३१. सुरेश रामभाऊ सारसे
३२. सचिन सारसे
३३. गजानन छबिले
३४. श्रीकृष्ण वाकडे
३५. सुभाष कटोले
३६. राजरत्न चक्रनारायण
३७. शिवलाल चक्रनारायण
३८. रामदास सोळंके
३९. राहुल सारसे
४०. बंडूभाऊ इंगळे
४१. गौरव सारसे
४२. दत्तात्रय सुभाष सारसे
४३. माणिकराव तायडे
४४. देवलाल शालिग्राम सारसे
४५. लक्ष्मी बाई
४६. पुरुषोत्तम मालानी
४७. गजानन रामकृष्ण छबिले
४८. उत्तम गोविंदा वाकडनारायण
४९. कु. प्रिया श्रीकृष्ण वाकडे
५०. आकाश श्रीकृष्ण वाकडे
५१. शालिग्राम सारसे
५२. उमेश गोविंदा वाकडनारायण
५३. किशोर गोविंदा वाकडनारायण
५४. प्रमोद इंगळे
५५. सुरेश रामभाऊ सारसे
शेतकऱ्यांकडून आभार व्यक्त
दीपोत्सवाच्या पर्वात संकटाच्या काळात शेतकऱ्यांना आधार देऊन त्यांचा प्रश्न मार्गी लावल्याबद्दल सर्व शेतकरी आमदार रणधीर सावरकर यांच्या निवासस्थानी पोहोचले. सातत्यपूर्ण पाठपुराव्यामुळे न्याय मिळाल्याचा आनंद व्यक्त करत शेतकऱ्यांनी आमदार सावरकर यांचा सत्कार केला.
यावेळी शेतकऱ्यांनी आमदार रणधीर सावरकर, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि महाराष्ट्र सरकारचे आभार मानले. आमदार नसतानाही आमच्यासाठी लढलात आणि आमदार झाल्यानंतर आमच्या हक्काचे पैसे मिळवून देऊन कर्तव्याची पूर्तता केली, अशी भावना शेतकऱ्यांनी व्यक्त केली.
यावेळी परमेश्वर साखरे, सचिन सारसे, देवलाल सारसे, गजानन छबिले, ज्ञानेश्वर छबिले, श्रीकृष्ण वाकडे, सुभाष कटोले, राजरत्न चक्रनारायण, शिवलाल चक्रनारायण, रामदास सोळंके, राहुल सारसे, बंडूभाऊ इंगळे, गौरव सारसे आदी शेतकरी उपस्थित होते.
शेतकऱ्यांच्या प्रश्नांबाबत संवेदनशील राहून त्यांना न्याय मिळवून देणे, सर्वसामान्यांच्या समस्या सोडवणे आणि सर्वांगीण विकासासाठी शासनाकडे सातत्याने पाठपुरावा करणे, हे आमदार रणधीर सावरकर यांच्या कार्याचे वैशिष्ट्य असल्याचे या प्रसंगातून अधोरेखित झाले.
