JALGAON | यावल तालुक्याला थेट जळगाव शहराशी जोडणाऱ्या शेळगाव बॅरेजवरील नागरी वाहतूक पुलाच्या कामाला आता अधिक गती देण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत. पुलाचे काम अंतिम टप्प्यात असून, हा मार्ग सुरू झाल्यानंतर नागरिकांचा प्रवास सुकर होणार आहे. जलसंपदा मंत्री गिरीश महाजन यांनी प्रकल्प भेटीदरम्यान अधिकाऱ्यांना महत्त्वाच्या सूचना दिल्या आहेत.
यावल तालुक्याला जळगाव शहराशी जोडणाऱ्या महत्त्वाकांक्षी शेळगाव बॅरेज प्रकल्पावरील नागरी वाहतूक पुलाचे बांधकाम अंतिम टप्प्यात आले आहे. या पुलाच्या कामाला अधिक गती देण्याच्या सूचना जलसंपदा मंत्री गिरीश महाजन यांनी प्रकल्प भेटीदरम्यान संबंधित अधिकाऱ्यांना दिल्या.
यावल तालुक्यासाठी जलक्रांतीचे वरदान ठरणाऱ्या शेळगाव बॅरेज मध्यम प्रकल्पावरील हा पूल यावल शहराला जळगाव जिल्ह्याच्या मुख्य शहराशी जोडणारा महत्त्वाचा दुवा ठरणार आहे. पुलामुळे नागरिकांचे जवळपास २० ते २२ किलोमीटरचे अंतर कमी होणार असून, दळणवळणासाठी नवा मार्ग उपलब्ध होणार आहे.
परिसरात अपघातात गंभीर जखमी झालेल्या रुग्णांना या मार्गाने तातडीने जिल्हा रुग्णालयात पोहोचून उपचार घेणे शक्य होणार आहे. तसेच किराणा आणि फळ-भाजीपाला विक्री करणाऱ्या व्यापाऱ्यांनाही जळगावची मोठी बाजारपेठ उपलब्ध होऊन व्यवसायाला चालना मिळण्याची अपेक्षा आहे.
दरम्यान, राज्याचे जलसंपदा मंत्री गिरीश महाजन यांनी नुकतीच शेळगाव बॅरेज मध्यम प्रकल्पाला भेट दिली. यावेळी रावेर-यावल मतदारसंघाचे आमदार अमोल हरीभाऊ जावळे, शेळगाव प्रकल्पाचे अधिकारी आणि भारतीय जनता पक्षाचे प्रमुख पदाधिकारी उपस्थित होते.
#Jalgaon #Yawal #ShelgaonBarrages #GirishMahajan #AmolJawale #DevelopmentNews #Infrastructure #MaharashtraNews #NTVNewsMarathi #यावल #जळगाव #शेळगावबॅरेज #गिरीशमहाजन #विकासकाम #नागरीवाहतूक #मराठीबातम्या
