JALGAON | निवडणुकीतून माघार घेतल्याच्या चर्चांना आर. जी. पाटील यांनी पूर्णविराम दिला आहे. मतदारांच्या आग्रहास्तव आपण निवडणुकीच्या रिंगणात असून, पसरवल्या जाणाऱ्या अफवांवर विश्वास ठेवू नये, असे आवाहन त्यांनी केले आहे.
यावल तालुक्यातील जिल्हा मध्यवर्ती बँकेच्या विविध कार्यकारी सहकारी सोसायटी यावल मतदारसंघातून निवडणूक लढवत असलेले आर. जी. नाना पाटील यांनी आपल्याबाबत माघार घेतल्याच्या अफवा पसरवल्या जात असल्याचा खुलासा केला आहे. या अफवांवर मतदारांनी विश्वास ठेवू नये, असे आवाहन त्यांनी केले.
पत्रकारांशी बोलताना पाटील यांनी सांगितले की, जिल्हा मध्यवर्ती बँकेच्या उपचेअरमन पदाची जबाबदारी त्यांनी यशस्वीरित्या सांभाळली असून, शेतकरी, सोसायटी आणि कामगारांच्या हिताचे निर्णय घेतले आहेत. गेल्या १४ वर्षांच्या अनुभवातून बँकेच्या माध्यमातून शेतकऱ्यांचे अनेक प्रश्न सोडवले असून, मतदारांना आपल्या कामाची माहिती असल्याचे त्यांनी सांगितले.
आपण भारतीय जनता पक्षाचे कार्यकर्ते असून आजपर्यंत पक्षाचे काम केले आहे आणि पुढेही करत राहणार असल्याचे त्यांनी स्पष्ट केले. मात्र, मतदारांच्या आग्रहास्तव उमेदवारी अर्ज दाखल केला असून सध्या अपक्ष उमेदवार म्हणून निवडणूक लढवत असल्याचे त्यांनी सांगितले.
आपण माघार घेतल्याचा चुकीचा संदेश काही लोकांकडून पसरवण्यात येत असल्याचा आरोप करत, विकासो सोसायटी मतदारसंघात आपण प्रबळ दावेदार असून विजय निश्चित असल्याचा विश्वास आर. जी. पाटील यांनी व्यक्त केला.
#Yawal #Jalgaon #RGPatil #ElectionNews #CooperativeBankElection #PoliticalNews #IndependentCandidate #MaharashtraPolitics #NTVNewsMarathi #यावल #जळगाव #आरजीपाटील #निवडणूक #राजकीयबातम्या #मराठीबातम्या
