AKOLA | अकोला जिल्ह्यात दुष्काळसदृश परिस्थिती निर्माण झाली असून, पाणीसाठे आटत चालल्याने जलसंधारणाची कामे महत्त्वाची ठरत आहेत. याच पार्श्वभूमीवर कुरणखेड येथील श्री चंडिका देवी संस्थानमागील तलावाच्या खोलीकरण कामाला आज शुभारंभ करण्यात आला.

जिल्ह्याचे खासदार अनुप धोत्रे यांच्या विशेष प्रयत्नातून आणि नाम फाउंडेशनच्या माध्यमातून कुरणखेड येथील तलावाच्या खोलीकरण कामाला २१ नोव्हेंबर रोजी सकाळी सुरुवात झाली. जेसीबी मशीनच्या सहाय्याने तलावातील गाळ काढून खोलीकरण करण्यात येणार असून, यामुळे पावसाळ्यात अधिक पाणीसाठा होण्यास मदत होईल. भविष्यात जलसंधारण आणि भूजल पातळी वाढविण्यासाठी हे काम महत्त्वपूर्ण ठरणार आहे.

या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी श्री चंडिका देवी संस्थानचे अध्यक्ष प्रशांत देशमुख होते. प्रमुख उपस्थितीमध्ये खासदार अनुप धोत्रे, कार्यकारी अभियंता अमोल म्हस्कर, अभियंता सारिका पाटील, नाम फाउंडेशनचे राजूभाऊ शेळके, भाजप महाराष्ट्र प्रदेश कार्यकारिणी सदस्य अण्णा उमाळे, माजी भाजपा मंडळाध्यक्ष प्रशांत ठाकरे, प्रशांत पांडे, प्रमोद गोगटे, मनीष तिवारी, अमन महल्ले, सुयोग देशमुख, उज्ज्वल देशमुख, डॉ. गावंडे, शंकर महल्ले, मंगेश कातखेडे, गोपाल बोळे, देवर, अमोल देवके आणि योगेश खांदेल यांच्यासह ग्रामस्थ उपस्थित होते.

दुष्काळी परिस्थितीवर मात करण्यासाठी जलसंधारणाची कामे काळाची गरज बनली असून, नाम फाउंडेशनच्या सहकार्याने सुरू झालेल्या या उपक्रमामुळे कुरणखेड परिसरातील पाणी साठवण क्षमतेत वाढ होण्यास मदत होईल, अशी अपेक्षा व्यक्त केली जात आहे.

विशेष बाब म्हणजे, तलावाच्या खोलीकरणातून निघणारा गाळ परिसरातील शेतकऱ्यांना विनामूल्य देण्यात येणार आहे. यामुळे शेतजमिनीची सुपीकता वाढण्यास मदत होणार असून, शेतकऱ्यांनाही या उपक्रमाचा मोठा लाभ मिळणार आहे.


#Akola #KuranKhed #AnupDhotre #WaterConservation #NAMFoundation #LakeDeepening #WaterStorage #FarmerSupport #Agriculture #MaharashtraNews #NTVNewsMarathi #अकोला #कुरणखेड #जलसंधारण #शेतकरी #नामफाउंडेशन #अनुपधोत्रे

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *