जळगाव जिल्ह्यातील यावल तालुक्यातील किनगाव येथे शिवभक्तांसाठी धार्मिक पर्वणी आयोजित करण्यात आली आहे. भवानीपेठ येथील आई रेणुकामाता मंदिरात २६ नोव्हेंबरपासून संगीतमय शिवमहापुराण कथेचे आयोजन करण्यात आले आहे.
किनगाव येथील भवानीपेठ भागातील आई रेणुकामाता मंदिरात गुरुवार, २६ नोव्हेंबर ते बुधवार, २ डिसेंबरदरम्यान संगीतमय शिवमहापुराण कथेचे आयोजन करण्यात आले आहे. दररोज रात्री ८:३० ते १०:३० या वेळेत कथा होणार आहे.
या कथेचे वाचन ह.भ.प. महंत सौ. इंद्रायणीताई महाराज (पाथर्डे, मालेगाव) करणार आहेत. ऑर्गन वादनाची सेवा ह.भ.प. संतोष महाराज (नेपानगर), ढोलक वादन ह.भ.प. राधेश्यामजी महाराज (लाल माती), संगीत गायन ह.भ.प. मुकेशजी महाराज (सांगवी), तर वेशभूषेची सेवा ह.भ.प. आबाजी महाराज (नेर) देणार आहेत.
किनगाव बुद्रुक आणि किनगाव खुर्द यांच्या संयुक्त विद्यमाने या कथेचे आयोजन करण्यात आले असून, परिसरातील भाविकांनी या धार्मिक कार्यक्रमाचा लाभ घ्यावा, असे आवाहन आयोजकांनी केले आहे.
