जळगाव जिल्ह्यातील यावल येथे बाल संस्कार माध्यमिक विद्यालयात विद्यार्थिनींच्या आरोग्याबाबत जनजागृती करण्यासाठी विशेष शिबिराचे आयोजन करण्यात आले. या शिबिरात आठवी ते दहावीच्या विद्यार्थिनींची मोफत रक्त तपासणी आणि शरीर संरचना मूल्यांकन करण्यात आले.

यावल येथील बाल संस्कार माध्यमिक विद्यालयात सोमवार, दिनांक २३ नोव्हेंबर २०२६ रोजी महिलांच्या आरोग्याबाबत जनजागृती करण्याच्या उद्देशाने विशेष आरोग्य शिबिराचे आयोजन करण्यात आले. फायझर कंपनीच्या सौजन्याने आयोजित या शिबिरात इयत्ता आठवी ते दहावीच्या सर्व विद्यार्थिनींची रक्त तपासणी तसेच शरीर संरचना तपासणी करण्यात आली.

दुपारी १२ ते २ या वेळेत पार पडलेल्या शिबिराचा उद्देश विद्यार्थिनींना शरीरातील विविध घटकांची माहिती देणे आणि आरोग्यविषयक आवश्यक मार्गदर्शन करणे हा होता.

फायझर कंपनीचे प्रतिनिधी विलास राजहंस यांनी विद्यार्थिनींना मार्गदर्शन करून शरीरातील विविध घटकांविषयी माहिती दिली. रक्त तपासणी अनिल पवार, टेक्निशियन, लाईक सायन्सेस यांनी केली.

या वेळी आरोग्य अधिकारी डॉ. उमेश कवडीवाले, आरोग्य अधिकारी डॉ. स्वाती कवडीवाले, संस्थाध्यक्ष महेश वाणी, संस्थेचे सहसचिव संतोष कवडीवाले, मुख्याध्यापक अतुल गर्गे, सर्व शिक्षक आणि शिक्षकेतर कर्मचारी यांनी शिबिर यशस्वी होण्यासाठी सहकार्य केले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *