मुंबईतील अरबी समुद्रात प्रस्तावित छत्रपती शिवाजी महाराज स्मारकाच्या कामाबाबत शासनाकडून अधिकृत माहिती आणि ठोस कार्यवाही व्हावी, या मागणीसाठी आता आंदोलनाचा इशारा देण्यात आला आहे. यावल तालुक्यातील मोहन रमेश वारे पाटील यांनी ५ जानेवारी २०२७ पासून बेमुदत शांततापूर्ण आमरण उपोषण करण्याचा मानस व्यक्त केला असून, यासाठी यावल पोलिसांकडे लेखी अर्ज सादर केला आहे.

मुंबई येथील अरबी समुद्रातील प्रस्तावित छत्रपती शिवाजी महाराज स्मारकाच्या कामाबाबत शासनाकडून अधिकृत माहिती आणि ठोस कार्यवाही व्हावी, या मागणीसाठी किनगाव बु., ता. यावल येथील मोहन रमेश वारे पाटील यांनी ५ जानेवारी २०२७ पासून किनगाव बु. येथील छत्रपती शिवाजी महाराज स्मारकाजवळ बेमुदत शांततापूर्ण आमरण उपोषण करण्याचा मानस व्यक्त केला आहे. याबाबत त्यांनी यावल पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक यांच्याकडे लेखी परवानगीसाठी अर्ज सादर केला आहे.

अर्जात मुंबईतील अरबी समुद्रातील प्रस्तावित छत्रपती शिवाजी महाराज स्मारकाच्या सद्यस्थितीबाबत शासनाने अधिकृत माहिती द्यावी, अशी मागणी करण्यात आली आहे. स्मारकाचे काम सुरू करण्यासाठी किंवा पुढे नेण्यासाठी असलेल्या प्रलंबित बाबी, निधीची स्थिती आणि अपेक्षित कालमर्यादा स्पष्ट करावी, अशी मागणीही करण्यात आली आहे.

तसेच, त्यांच्या शिष्टमंडळाला संबंधित मंत्री आणि वरिष्ठ अधिकाऱ्यांसोबत मंत्रालयात प्रत्यक्ष चर्चा करण्यासाठी अधिकृत बैठक द्यावी. बैठकीतील चर्चेनंतर स्मारकाच्या कामाबाबत पुढील कार्यवाहीचा कालबद्ध कार्यक्रम लेखी स्वरूपात द्यावा, अशी मागणी निवेदनात करण्यात आली आहे.

या विषयासंदर्भात ३१ ऑगस्ट २०२६ रोजी ई-मेलद्वारे, तसेच १३ सप्टेंबर २०२६ रोजी मंत्रालयात प्रत्यक्ष लेखी निवेदन मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री, महाराष्ट्र राज्य यांच्याकडे सादर करण्यात आले होते.

मात्र, स्मारकाच्या कामाची सद्यस्थिती, काम सुरू करण्याची अधिकृत कालमर्यादा आणि शासनाच्या पुढील कार्यवाहीबाबत स्पष्टता मिळावी, यासाठी ५ जानेवारी २०२७ पासून किनगाव बु. येथील छत्रपती शिवाजी महाराज स्मारकाजवळ बेमुदत शांततापूर्ण आमरण उपोषण करण्याचा मानस असल्याचे मोहन वारे पाटील यांनी अर्जात नमूद केले आहे.

याबाबतचा लेखी अर्ज यावल पोलीस ठाण्यात देण्यात आला असून, आता शासन या मागण्यांवर काय भूमिका घेते आणि स्मारकाच्या कामाबाबत कोणती स्पष्टता देते, याकडे लक्ष लागले आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *