खापा येथील कुंभारपुरा बाजार चौकातील रहिवासी आणि पथविक्रेते इसराईल (भुरू भाई / ईस्सू भाई) पीरु शेख (वय ४५ वर्षे) यांचे सोमवार, २३ नोव्हेंबर २०२६ रोजी सकाळी साडेअकरा वाजता हृदयविकाराच्या तीव्र झटक्याने दुःखद निधन झाले.
त्यांचा अंत्यविधी रात्री आठ वाजता नवीन बसस्थानकाजवळील मुस्लिम कब्रस्तान, खापा येथे करण्यात आला.
त्यांच्या पश्चात पत्नी, दोन मुली, भाऊ, पुतणे असा परिवार आहे.
भावपूर्ण श्रद्धांजली!
