कार्तिक पौर्णिमेनिमित्त अकोल्यात देवदिवाळीचा भव्य सोहळा आयोजित करण्यात आला आहे. मोठ्या राम मंदिरात १२५ वर्षांची परंपरा जपत पाच हजार दिवे प्रज्वलित केले जाणार असून, विशेष रांगोळी आकर्षण ठरणार आहे.

सिद्धहस्त रांगोळी कलाकार प्रवीण पवार हे प्रभू श्रीरामांचे रेखाटन आणि पाणी बचतीचा संदेश देणारी विशेष रांगोळी साकारणार आहेत. यावेळी विशेष पूजा-अर्चना करून अकोलेकरांच्या आरोग्यासाठी आणि मनोकामना पूर्तीसाठी प्रार्थना करण्यात येणार आहे.

या पूजेला आमदार रणधीर सावरकर, सौभाग्यवती मंजुषाताई सावरकर, महापौर शारदाताई खेडकर आणि स्थायी समिती सभापती विजय अग्रवाल उपस्थित राहणार आहेत.

अकोला शहरातील ७२ मंदिरांसह जिल्ह्यात विविध ठिकाणी देवदिवाळी साजरी केली जाणार आहे. मोठ्या राम मंदिराने सुरू केलेली १२५ वर्षांची परंपरा आजही कायम आहे.

या सोहळ्याचा आणि दर्शनाचा लाभ सर्वांनी घ्यावा, असे आवाहन श्रीराम व हरिहर संस्थेच्या अध्यक्षा सुमनदेवी अग्रवाल यांनी केले आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *