अहिल्यानगर जिल्ह्यातील पाथर्डी तालुक्यात लोहसर येथे श्री. काळभैरवनाथ जन्मोत्सवानिमित्त भव्य अखंड हरिनाम सप्ताह आणि कीर्तन महोत्सवाचे आयोजन करण्यात आले आहे. २५ नोव्हेंबर ते २ डिसेंबरदरम्यान विविध नामवंत कीर्तनकारांची सेवा भाविकांना अनुभवता येणार आहे.

आदर्श गाव लोहसर येथील जागृत श्री. क्षेत्र काळभैरवनाथ देवस्थानच्या जन्मोत्सवानिमित्त बुधवार, २५ नोव्हेंबर ते २ डिसेंबर २०२६ या कालावधीत अखंड हरिनाम सप्ताह व कीर्तन महोत्सव आयोजित करण्यात आला आहे. महंत संतोष महाराज गीते यांच्या मार्गदर्शनाखाली हा धार्मिक सोहळा पार पडणार आहे.

या महोत्सवात ज्ञानेश्वर महाराज तांबे, नेहाताई महाराज भोसले, तुकाराम महाराज मुंडे, जयेश महाराज भाग्यवंत, राधाताई महाराज सानप, बबन महाराज बहिरवाल आणि कोमलसिंग महाराज राजपूत यांची कीर्तन सेवा होणार आहे.

२ डिसेंबर रोजी महंत संतोष महाराज शास्त्री, निरंजन संस्थान, एकनाथवाडी यांचे काल्याचे कीर्तन होईल. त्यानंतर भाविकांना महाप्रसादाचे वाटप करण्यात येणार आहे. यंदाचा महाप्रसाद देवस्थान ट्रस्टचे खजिनदार शिवाजीराव तुळशीराम दगडखैर यांच्या वतीने देण्यात येणार आहे.

या धार्मिक सोहळ्यात परिसरातील भाविकांनी मोठ्या संख्येने सहभागी व्हावे, असे आवाहन देवस्थान ट्रस्टचे अध्यक्ष अनिल गीते पाटील आणि संयोजक मंडळाने केले आहे.

भिवसेन टेमकर, अहिल्यानगर

#Lohsar #Pathardi #Ahilyanagar #Kalbhairavnath #HarinaamSaptah #KirtanMahotsav #Maharashtra #Bhakti #NTVNewsMarathi #लोहसर #पाथर्डी #अहिल्यानगर #काळभैरवनाथ #हरिनामसप्ताह #कीर्तनमहोत्सव

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *