नागपूर जिल्ह्यातील रामटेक येथे ४५ वी श्री त्रिपुरी पौर्णिमा आणि वैकुंठ चतुर्दशी शोभायात्रा मोठ्या उत्साहात पार पडली. आकर्षक चित्ररथ, पौराणिक देखावे आणि हजारो भाविकांच्या उपस्थितीने संपूर्ण रामनगरी भक्तिमय झाली होती.

भारतीय जनसेवा मंडळाच्या वतीने सोमवारी, २३ नोव्हेंबर रोजी आयोजित ४५ वी श्री त्रिपुरी पौर्णिमा व वैकुंठ चतुर्दशी शोभायात्रा उत्साहात संपन्न झाली.

अठराभुजा गणेश मंदिरात विधिवत पूजन आणि आरती करून शोभायात्रेला सुरुवात करण्यात आली. यावेळी मंडळाचे अध्यक्ष तथा पर्यटक मित्र चंद्रपाल चौकसे, कैलासपुरी महाराज, सुखदेव उरकुडे महाराज, मुकेश महाराज आणि मनोज महाराज उपस्थित होते.

आकर्षक चित्ररथ, पौराणिक देखावे, पारंपरिक वेशभूषा आणि भक्तिगीतांनी रामनगरी दुमदुमून गेली. जय श्रीराम आणि हर हर महादेवच्या जयघोषाने वातावरण भक्तिमय झाले.

यावेळी राज्यमंत्री ॲड. आशिष जयस्वाल, खासदार श्यामकुमार बर्वे, माजी आमदार डी. मल्लिकार्जुन रेड्डी, आमदार कृपाल तुमाने, नगराध्यक्ष बीकेंद्र महाजन यांच्यासह अनेक मान्यवर उपस्थित होते.

रामटेकचा धार्मिक आणि ऐतिहासिक वारसा जतन करून पुढील पिढीपर्यंत पोहोचविणे ही सर्वांची जबाबदारी असल्याचे चंद्रपाल चौकसे यांनी सांगितले. तसेच धार्मिक सलोखा आणि सामाजिक ऐक्य जपण्याचे आवाहन केले.

शोभायात्रेच्या यशस्वितेसाठी आयोजन समितीचे अध्यक्ष राजेश किंमतकर, कार्याध्यक्ष राहुल गुंढरे यांच्यासह मंडळाचे पदाधिकारी, कार्यकर्ते, प्रशासन, पोलीस विभाग आणि रामटेककर नागरिकांनी विशेष परिश्रम घेतले.

रामटेक, नागपूर

#Ramtek #Nagpur #TripuriPurnima #VaikunthaChaturdashi #Shobhayatra #AshishJaiswal #IndianJansevaMandal #MaharashtraNews #NTVNewsMarathi #रामटेक #नागपूर #त्रिपुरीपौर्णिमा #शोभायात्रा #वैकुंठचतुर्दशी

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *