वाशीम:-मनमिळावू व कर्तव्यदक्ष अधिकारी म्हणून नावलौकीक असलेले वि.अधिकारी श्री.भाऊराव बेलखेडकर यांचेकडे आता मंगरुळपीर पंचायत समीतीच्या गटविकास अधिकारी पदाची धुरा आहे.वाशिम मुख्यकार्यकारी अधिकारी यांनी एका आदेशपञानुसार ही जबाबदारी त्यांना दिली आहे.

पंचायत समिती मंगरुळपीर अंतर्गत जवळपास ७५ खेडी आहेत.या सर्व गावांचा सर्वांगीन विकास तसेच लोककेंद्री प्रशासनाव्दारे जनतेचे कामे वेळेत व्हावीत याकरीता कर्तव्यदक्ष आणी विकासात्मक भुमिका घेवून प्रशासन चालवणार्‍या अधिकार्‍याची गरज होती.त्यानुसार पंचायत विभागात विस्तार अधिकारी म्हणून प्रशासकीय कामांचा दांडगा अनूभव असणारे,लोककेंद्री प्रशासनतंञ चालवन्यात हातखंडा असणारे व सर्व कर्मचार्‍यांशी मिळून मिसळुन जनतेची कामे होवुन आपल्या पंचायत समितीअंतर्गत गावांचा विकास साधणारे श्री.भाऊराव बेलखेडकर यांचेकडे नूकताच गटविकास अधिकारी पदाचा प्रभार देण्यात आला आहे.

मुख्य कार्यकारी अधिकार्‍यांनी दाखवलेल्या विश्वासाला आपण सार्थकी लावुन तालुक्याचा सर्वतोपरी विकास साधन्यास कटिबध्द असल्याचे यावेळी बेलखेडकर यांनी सांगीतले.दि.१८ मे रोजी त्यांनी रितसर प्रभार स्विकारला यावेळी सर्व कर्मचारी,सामाजीक कार्यकर्ते,पं.स.आणी जि.प.सदस्य,सरपंच आणी बर्‍याच नागरीकांनी बिडीओ बेलखेडकर यांचे शाल श्रिफळ व पुष्पगुच्छ देवुन सत्कार करुन भावी वाटचालीस शुभेच्छा दिल्या.एका कर्तव्यदक्ष अधिकार्‍याकडे मंगरुळपीर पंचायत समितिच्या गटविकास अधिकार्‍याची धुरा दिल्याबद्दल नागरीकांनी प्रशासनाचे आभारही मानले.

प्रतिनीधी:-फुलचंद भगत
मंगरूळपीर/वाशिम
मो.8459273206

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *