पुणे : भाजपचे ज्येष्ठ नेते माजी आमदार बाबुराव पाचर्णे यांचे दीर्घ आजाराने निधन झाले आहे. भारतीय जनता पार्टीचे नेते व माजी मंत्री हर्षवर्धन पाटील यांनी तर्डोबाचीवाडी येथील निवासस्थानी जाऊन स्व. बाबुराव पाचर्णे यांना श्रद्धांजली अर्पण केली तसेच त्यांच्या कुटुंबांचे सात्वंन करीत त्यांच्या निधनाबद्दल दुःख व्यक्त केले.
माजी मंत्री हर्षवर्धन पाटील यांनी माजी जिल्हा परिषद सदस्य राहुल बाबुराव पाचर्णे यांच्याशी संवाद साधत त्यांना धीर दिला तसेच पाचर्णे कुटुंबाला दुःखातून सावरण्याची शक्ती देवो अशी प्रार्थना केली.

माजी आमदार स्व. बाबुराव पाचर्णे यांचे सामाजिक , शैक्षणिक व राजकीय क्षेत्रातील कार्य मोठे असल्याचे यावेळी माजी मंत्री हर्षवर्धन पाटील यांनी सांगितले.
एन टीव्ही न्यू साठी प्रतिनिधी पल्लवी चांदगुडे इंदापूर पुणे