पुणे : माजी राज्यमंत्री विकास रत्न आमदार श्री दत्तात्रय मामा भरणे यांच्या शुभहस्ते किरण मगर यांची विवो प्रो कबड्डी सीजन नऊ मध्ये यु मुंबा संघात 31 लाख रुपयांची बोली लागून निवड झाल्याबद्दल राणा प्रताप क्रीडा मंडळ कळम यांचा शाल, फेटा व श्रीफळ देऊन सत्कार समारंभ करण्यात आला आहे. इंदापूर तालुक्यातील कळंब गावाला कबड्डी ची पहिल्यापासून परंपरा असल्याचे1977 पासून आदरणीय कैलास गुलाबराव नाना यांच्यापासून चालत असलेली कबड्डीची परंपरा पुढे श्री मधुकर बापू पाटील यांनी कबड्डी मध्ये चांगला खेळ दाखवून राज्य देशपातळीवर वीर पुरस्कार मिळवले असे आमदार भरणे मामांनी आपल्या वक्तव्यात सांगितले आहे.
कबड्डी ची ही परंपरा अशीच पुढे चालवत किरण मगर यांनी अत्यंत प्रतिकूल परिस्थितीत असतानाही प्रत्येक संकटावर मात करून आपल्या खेळाशी प्रामाणिक राहून प्रचंड मेहनत घेतल्याने त्याला आजचे कबड्डी मधील स्तुंग यश प्राप्त झाले आहे, आणि त्याने कळम सह इंदापूर तालुक्याचे नाव देश पातळीवर लिहून इंदापूर तालुक्याचा लोकप्रतिनिधी म्हणून मला गर्व असून याचा मला माझ्या इंदापूर तालुक्यात तमाम जनतेचा जनतेला निश्चितच अभिमान आहे, असे भरणे मामा म्हणाले. या पुढील काळात किरणला खेळाच्या दृष्टीने ज्या काही बाबींची गरज असेल, त्यासाठी मी इंदापूर तालुक्याचा लोकप्रतिनिधी म्हणून त्याचा सदैव खंबीरपणे पाठीशी उभा राहणार असल्याचे जाहीर गवाही आदरणीय श्री दत्तात्रय मामा भरणे यांनी उपस्थित त्यांना दिली आहे. या कार्यक्रमाच्या प्रसंगीकळम, निमसाखर, घोरपडवाडी परिसरातील ज्येष्ठ नेते तसेच कार्यकर्ते ग्रामस्थ, युवक मोठ्या संख्येने उपस्थित होते.
एन टीव्ही न्यूज साठी प्रतिनिधी पल्लवी चांदगुडे इंदापूर पुणे