पुणे : महाराष्ट्र मधील पुणे जिल्ह्यातील पानशेत धरण पूर्ण क्षमतेने म्हणजे १०० टक्के भरले असल्याने पानशेत धरणाच्या सांडव्यावरून नदीपात्रामध्ये सुरू असणारा विसर्ग कमी करून सायंकाळी ४ वाजता वा. १२ हजार ९३६ क्यूसेक्स करण्यात येत आहे.

आंबी नदी ही पुण्यातील मुठा नदीची उपनदी आहे. या नदीवर पानशेत धरण प्रकल्प आहे.सतत चालू असलेल्या पावसाच्या प्रमाणानुसार व येव्यानूसार विसर्ग पुन्हा कमी/जास्त करण्याची शक्यता आहे.नागरिकांनी नदीपात्रात उतरू नये आणि योग्य ती खबरदारी व दक्षता घ्यावी असा संदेश देण्यात आलेला आहे.

एन टीव्ही न्यूज साठी प्रतिनिधी पल्लवी चांदगुडे पुणे

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *