पुणे : इंदापूर येथील मातोश्री रमाबाई आंबेडकर विद्यार्थी वसतिगृह ट्रस्ट संचलित प्राथमिक, माध्यमिक व उच्च माध्यमिक आश्रमशाळा तसेच मुलांचे व मुलींचे अनुदानित वसतिगृह यांच्या संयुक्त विद्यमाने डॉ. बाबासाहेब आंबेडकर शैक्षणिक संकुलात राजमाता अहिल्याबाई होळकर यांचा स्मृतिदिन साजरा करण्यात आला.

   यावेळी संस्थेचे सचिव ॲड. समीर मखरे यांच्या हस्ते सर्वोत्तम भूमिपुत्र तथागत गौतम बुद्ध मूर्तीस पुष्प, राजमाता अहिल्याबाई होळकर यांच्या प्रतिमेला पुष्पहार तर संस्थेचे दिवंगत अध्यक्ष रत्नाकर मखरे (तात्या) यांच्या प्रतिमेस पुष्प अर्पण करून अभिवादन केले. यावेळी  गौरी रुपनवर (७ वी), पूर्वा आरगडे (११वी)ह्या विद्यार्थींनींची भाषणे झाली. यावेळी उपप्राचार्या सविता गोफणे यांनी राजमाता अहिल्याबाई होळकर यांचा जीवनपट आपल्या भाषणातून विशद केला. 
   यावेळी इंदापूर नगरपरिषदेच्या माजी नगरसेविका व संस्थेचे अध्यक्षा आयु. शकुंतला रत्नाकर मखरे (काकी) या उपस्थित होत्या. 

तसेच संस्थेतील मुख्याध्यापक,प्राचार्या,प्राध्यापक, अधिक्षक, शिक्षक-शिक्षकेतर कर्मचारी, विद्यार्थी उपस्थित होते. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन हिरालाल चंदनशिवे सर यांनी केली.

पल्लवी चांदगुडे

इंदापूर, पुणे

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *