पुणे : भारतीय स्वातंत्र्याला 75 वर्ष पूर्ण होत असल्याने इंदापूर शहरातील तहसीलदार श्रीकांत पाटील यांनी "घरोघरी तिरंगा" अभियानात सहभागी होण्याचा संदेश सर्व नागरिकांना दिलेला आहे.
स्वातंत्र्य अमृत महोत्सवानिमित्त इंदापूर तालुक्यातील प्रशासकीय भवनला विद्युत रोषणाई देण्यात आलेले आहे. त्यामुळे इंदापूर शहराला चांगली सुंदरता प्राप्त झालेले आहे.
सर्वांनी आपल्या घरावरती राष्ट्रध्वज उभरावा आणि सर्व नागरिकांनी आपल्या घरी स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव साजरा करावा असे आवाहन केले आहे. अमृत महोत्सवामध्ये सर्व नागरिकांनी विद्यार्थ्यांनी सहभाग घ्यावा असे आवाहन इंदापूरचे तहसीलदार श्रीकांत पाटील यांनी केलेले आहे.
प्रत्येक नागरिकांनी आपल्या घरी राष्ट्रध्वज उभारून आपल्या देशाबद्दल प्रेमाची आणि आपुलकीची भावना दाखवावी.
इंदापूर पुणे
पल्लवी चांदगुडे