पुणे : इंदापूर तालुक्यातील डिकसळ येथे जिल्हा वस्ताद शिवाजी काळे प्रतिष्ठानव व सहकारात्मक उत्तमराव काळे फाउंडेशनच्या वतीने दरवर्षी देण्यात येणारा समाजभूषण पुरस्कार यावर्षी अध्यात्मिक क्षेत्रातील उत्कृष्ट राष्ट्रीय कीर्तनकार ह.भ.प.शरद महाराज काळे - देशमुख यांना पुरस्कार शिवदास सूर्यवंशी यांच्या पत्नी सुनिता सूर्यवंशी यांच्या हस्ते प्रदान करण्यात आला आहे.
ह.भ.प.शरद महाराज काळे देशमुख यांनी सन 2010 पासून संतांचे थोर विचार, व्यसनमुक्ती, जनजागृती तसेच ऐतिहासिक छत्रपतीच्या संपूर्ण महाराष्ट्रात पोहोचवत समाजप्रबोध तसेच त्यांचे कीर्तन सेवा सात वेळा दूरदर्शनच्या वेगवेगळ्या चैनल वर व पाच वेळा रेडिओच्या प्रसारित करण्यात आले होते.ह.भ.प.शरद महाराज काळे देशमुख यांना यापूर्वी अनेक वेगवेगळ्या पुरस्काराने महाराष्ट्र सन्मानित केले गेले आहे.
एन टीव्ही न्यूज साठी प्रतिनिधी पल्लवी चांदगुडे इंदापूर पुणे