धाराशिव जिल्ह्यातील भूम येथे रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया (आठवले)च्या वतीने तहसील कार्यालयावर मोर्चा काढण्यात आला. विविध सहा मागण्यांसाठी मुख्यमंत्र्यांच्या नावे तहसीलदारांना निवेदन सादर करण्यात आले.

भूम तालुका शाखेच्या वतीने सोमवार, २ नोव्हेंबर रोजी हा मोर्चा काढण्यात आला.

दुष्काळग्रस्त शेतकरी व शेतमजुरांना आर्थिक मदत द्यावी, इंदिरा वाईन शॉपचा परवाना रद्द करावा, गरजूंना धान्य किट द्याव्यात आणि गरीब महिलांची खासगी फायनान्स कंपन्यांकडून होणारी कथित जबरदस्तीची वसुली थांबवावी, अशा मागण्या करण्यात आल्या.

तसेच गायरान जमिनी दलित, आदिवासी व भटक्या समाजाला वहिवाटीसाठी द्याव्यात आणि भूम ग्रामीण रुग्णालयातील आरोग्य सेवांमधील त्रुटींची चौकशी करून संबंधित वैद्यकीय अधिकाऱ्यांवर कारवाई करावी, अशी मागणी निवेदनातून करण्यात आली.

या निवेदनावर मराठवाडा प्रदेश उपाध्यक्ष भागवत शिंदे, माजी नगराध्यक्ष संजय शिंदे आणि तालुकाध्यक्ष झुंबर (भाऊ) गायकवाड यांच्या स्वाक्षऱ्या आहेत.

यावेळी पांडुरंग डवरी, अनिल डवरी, प्रेमदास चंदनशिवे, पांडुरंग गायकवाड, अमित गायकवाड, कैलास चंदनशिवे, भारत काळे यांच्यासह अनेक कार्यकर्ते उपस्थित होते.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *