छत्रपती संभाजीनगर पदवीधर मतदारसंघातून डॉ. प्रतापसिंह पाटील विजयी झाल्यानंतर धाराशिव शहरात समर्थकांनी जल्लोष केला. छत्रपती शिवाजी महाराज चौकात गुलालाची उधळण आणि जोरदार घोषणाबाजी करत आनंदोत्सव साजरा करण्यात आला.
यावेळी युवक प्रदेश सरचिटणीस इंजि. रामेश्वर पवार, प्रवीण घोलप, राष्ट्रवादी शिक्षक संघटनेचे जिल्हाध्यक्ष जिलिंदर पोळ, बांधकाम सेलचे जिल्हाध्यक्ष सरफराज पटेल, वैराग तालुकाध्यक्ष भालशंकर सर, वाहतूक संघटनेचे कार्याध्यक्ष विशाल पवार यांच्यासह शंकर इटकर, नितीन अंकुशराव, हेमंत पवार आणि सुहास कांबळे उपस्थित होते.
विविध संघटनांचे पदाधिकारी आणि कार्यकर्ते एकत्र येत डॉ. प्रतापसिंह पाटील यांच्या विजयाचा आनंद साजरा केला.
रफिक पटेल | एनटीव्ही न्यूज मराठी | येडशी, धाराशिव
