मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस बुधवार, दि. २३ सप्टेंबर रोजी लातूर, धाराशिव आणि सोलापूर जिल्ह्याच्या दौऱ्यावर जाणार आहेत. राज्यात झालेल्या अतिवृष्टीमुळे झालेल्या पीक-पाणी परिस्थितीची ते थेट बांधावर जाऊन पाहणी करणार आहेत. मुख्यमंत्री सचिवालयाकडून त्यांचा सविस्तर दौरा कार्यक्रम जाहीर करण्यात आला आहे.

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा उद्याचा दौरा कार्यक्रम जाहीर झाला असून, ते लातूर, धाराशिव आणि सोलापूर या तीन जिल्ह्यांचा दौरा करणार आहेत.

सकाळी ८.३० वाजता वर्षा निवासस्थानाहून मोटारीने छत्रपती शिवाजी महाराज आंतरराष्ट्रीय विमानतळाकडे प्रयाण करतील. तिथून ९ वाजता विमानाने लातूरकडे रवाना होतील. ९.५० ला लातूर विमानतळावर आगमन झाल्यावर ते मोटारीने जाऊ, ता. निलंगा येथे जातील. सकाळी १०.५५ वाजता जाऊ येथे पीक-पाणी परिस्थितीची पाहणी करतील.

त्यानंतर ११.२५ ला ते खरोसा, ता. औसा, जि. लातूरकडे प्रयाण करतील. ११.३५ ला खरोसा येथे दुसरी पाहणी करतील.

दुपारी १२.०५ ला करजखेडा, ता. जि. धाराशिवकडे रवाना होतील. १२.५५ ला करजखेडा येथे पीक-पाणी परिस्थितीची पाहणी करतील. त्यानंतर १.२५ ला मलकापूर, ता. कळंब, जि. धाराशिवकडे प्रयाण करतील. दुपारी २.३५ वाजता मलकापूर येथे पाहणी करतील.

दुपारी ३.०५ वाजता मौजे धानोरे, ता. बार्शी, जि. सोलापूरकडे प्रयाण करतील. ३.२० ला धानोरे येथे पाहणी करतील. त्यानंतर ३.५० ला कारंबा, ता. उत्तर सोलापूर येथे जातील. सायंकाळी ४.५० वाजता कारंबा येथे शेवटची पाहणी करतील.

सायंकाळी ५.२० ला सोलापूर विमानतळाकडे प्रयाण करतील. ५.४० ला विमानाने मुंबईकडे प्रयाण करून सायंकाळी ६.२५ ला मुंबई विमानतळावर आगमन होईल आणि ६.३० ला मोटारीने प्रयाण करतील.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *