सततची नापिकी, अपुरे शेती उत्पन्न आणि डोक्यावर कर्जाचा बोजा… या आर्थिक विवंचनेतून औसा तालुक्यातील हरेगाव येथील अल्पभूधारक शेतकरी अंगद विश्वंभर डोंगरे यांनी विष प्राशन करून आत्महत्या केल्याची दुर्दैवी घटना घडली आहे. या घटनेमुळे परिसरात हळहळ व्यक्त होत आहे.
औसा तालुक्यातील हरेगाव येथील अल्पभूधारक शेतकरी अंगद विश्वंभर डोंगरे यांनी विष प्राशन करून जीवन संपवले. त्यांच्याकडे अवघी पाऊणेदोन एकर शेती होती. सततची नापिकी आणि शेतीतून मिळणारे अपुरे उत्पन्न यामुळे ते आर्थिक अडचणीत होते.
त्यातच विविध कार्यकारी सेवा सहकारी सोसायटीचे सुमारे एक लाख रुपयांचे कर्ज त्यांच्या डोक्यावर होते. नापिकी आणि कर्जाच्या ओझ्यामुळे ते आर्थिक विवंचनेत असल्याची माहिती समोर आली आहे.
या दुर्दैवी घटनेमुळे हरेगाव परिसरात हळहळ व्यक्त होत असून, कोरडा दुष्काळ, नापिकी आणि कर्जबाजारीपणामुळे शेतकरी कुटुंबांसमोर निर्माण झालेला आर्थिक संकटाचा प्रश्न पुन्हा एकदा ऐरणीवर आला आहे.
जीवन जाधव | एनटीव्ही न्यूज मराठी | लातूर
