पुणे : राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार, विरोधी पक्षनेते खासदार सुप्रिया सुळे यांच्या सहकार्याने 'हर घर जल' योजनेच्या माध्यमातून इंदापूर तालुक्यातील १४६ गावांना ४५४ कोटी रुपयांचा निधी आपण मंजूर करून घेतला. मात्र, त्याचे श्रेय घेण्याची विरोधकांची चाललेली धडपड पाहून मला त्यांची किव येते.जनतेने मला जी मंत्री पदाची खुर्ची दिली तिचा पुरेपूर वापर मी तालुक्याच्या विकासासाठी केला याचे तुम्ही प्रत्येकजन साक्षिदार आहात. आता गावातील सरपंचाने सह कार्यकर्त्यांनी एक काम करावं माझं आवाहन आहे की आता घरात नाही तर पारापारावर बसा आणि करा चर्चा त्याशिवाय आपली सत्यता आणि विरोधकांची लबाडी ही जनतेसमोर येणार नाही असं प्रतिपादन माजी राज्यमंत्री आमदार दत्तात्रय भरणे यांनी केले.
इंदापूर तालुक्यातील जाधववाडी येथे शनिवारी दि.3 रोजी आमदार भरणे यांच्या शुभहस्ते जलजीवन मिशन अंतर्गत नळ पाणी पुरवठा योजना १ कोटी ५० लाख रुपये या कामाचा शुभारंभ करण्यात आला या प्रसंगी सभेला संबोधन करताना ते बोलत होते.या वेळी तालुकाध्यक्ष हनुमंत कोकाटे,जिल्हा नियोजन समितीचे माजी सदस्य सचिन सपकळ,कार्याध्यक्ष अतुल झगडे,युवकाध्यक्ष अँड.शुभमं निंबाळकर,जाधववडीचे सरपंच विठ्ठल जाधव,वरकुटे गावचे सरपंच बापूराव शेंडे,सोमनाथ वाघमोडे,महिला तालुकाध्यक्षा छाया पडसळकर,ग्रामपंचायत सदस्य आणि ग्रामस्त उपस्थित होते.
भरणे म्हणाले, आज विरोधक म्हणतात की हे काम मी केले, गुलाबराव पाटील यांच्या सहीने झाले. हो पण म्हणतो की ते काम आमचे मंत्री गुलाबराव पाटील यांच्या सहिनेच झाले आहे.मात्र तालुक्याचा आमदार मी आहे. आणि या योजनेचा कृती आराखडा तत्कालीन पुण्याचे पालकमंत्री अजित पवार आणि जिल्हा समितीचे असणारे सदस्य यांच्या समोर मी दादांकडून मंजूर करुन घेतला आहे. तो काय दिवसात मंजूर झालेला नाही.महाविकास आघाडी सरकार कोसळण्यापूर्वीच याचा अंतरीम प्रस्ताव हा राज्य शासनाने सहीसाठी पाठवलेला आहे. आज जे मंत्री आहेत तेच आमच्या सरकारमध्ये त्याच खात्याचे मंत्री होते त्यामुळे विरोधकांनी श्रेय्यासाठी जनतेला खोटं नाटं सांगू नये.जनता सुज्ञ आहे खर काय खोट काय लोक जानतात.
इंदापूर तालुक्यातील गोरगरीब मागासवर्गीय जनतेच्या घरापर्यंत शासनाच्या योजना पोहोचण्यासाठी 2012 पर्यंतची वाट का पाहावी लागली? त्याआधी इंदापूर तालुक्यात या भागांमध्ये विकास का झाला नाही, असा माझा विरोधकांना सवाल आहे.एखाद्या जिल्हा परिषदेच्या रस्त्याच्या कामाचा फोटो काढून ते काम निकृष्ट झाले आहे, अशी टीका माझ्यावर करतात. मात्र, सार्वजनिक बांधकाम विभागाच्या माध्यमातून इंदापूर तालुक्यातील निर्माण झालेले रस्त्याचे जाळे, याकडे मात्र ते डोळेझाक करतात.हे वागणं बरोबर नाही असं ही भरणे म्हणाले.
लग्नाच्या चाळीस वर्षानंतर महिलेले चारचौघात मानले आभार हीच माझ्या कामाची पावती…
कोणी कितीही टीका केली तर आज मनाला एक समाधान मिळते. घोलपवाडी भागात आज विकास कामाची भूमिपूजने करण्याकरिता गेलो तेव्हा चाळीस वर्षापूर्वी विवाह झालेली एक महिला मला चार चौघात भेटली. अनं थेट म्हणाली,मामा माझे लग्न होऊन आज चाळीस वर्षे झाली. तुम्ही पहिले आमदार आहात की माझ्या लग्नाच्या चाळीस वर्षानंतर आम्हाला या गावाला रस्ता मिळाला.तिचे ते शब्द ऐकून मला मला कामाची खरी पावती मिळाली त्यामुळे विरोधकांच्या टिकेला मी महत्व देत नाही.
या वेळी हनुमंत कोकाटे,बापूराव शेंडे यांनी मनोगत व्यक्त केले व सरपंच विठ्ठल जाधव यांनी प्रास्ताविकातून आमदार दत्तात्रय भरणे यांनी गावच्या विकासासाठी भरघोस निधी दिल्याबद्दल आभार मानत यापुढे जाधववाडी गाव हे राष्ट्रवादी काँग्रेस ला झुकते माप देईल असे आश्वासित केले.
एन टीव्ही न्यूज साठी प्रतिनिधी पल्लवी चांदगुडे इंदापूर पुणे