शिरूर येथील हलवाई चौक गणेश मित्रमंडळाच्या वतीने शिक्षकदिनानिमित्त ५ सप्टेंबरला शैक्षणिक क्षेत्रात उल्लेखनिय कार्य करणा-या ५ शिक्षकांना प्रेरणादायी शिक्षक पुरस्कार देवून सन्मानित करण्यात येणार असल्याची माहिती हलवाई चौक गणेश मित्र मंडळाचे अध्यक्ष प्रा.सतिश धुमाळ यांनी दिली.


दरवर्षी मंडळाच्या वतीने शैक्षणिक क्षेत्रात उल्लेखनीय कार्य करणा-यांचा विशेष सन्मान करण्यात येतो.


यंदाच्या वर्षी शिरूर येथील डेक्कन एज्युकेशन सोसायटी इंग्लिश स्कूल बाबुरावनगर येथे ५ सप्टेंबर २०२२ रोजी सकाळी साडेनऊ वाजता या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आलेले असून या कार्यक्रमात शिरूर येथील डेक्कन स्कूलचे प्राचार्य डॉ.समीर ओंकार, चांदमल ताराचंद बोरा कॉलेज मधील भुगोल विभागाच्या प्राध्यापिका डॉ.ज्योती भगवान धोत्रे, आमदाबाद येथील पांडुरंग थोरात विद्यालयाच्या मुख्याध्यापिका स्वाती प्रकाश थोरात, विद्याधाम प्रशालेचे क्रिडाशिक्षक संदीप भाऊसाहेब घावटे, पुणे येथील डेक्कन एज्युकेशन सोसायटीच्या शिक्षिका विद्या प्रल्हाद वाघमारे / सोळसे या शिक्षकांचा सन्मान करण्यात येणार आहे असे प्रा. धुमाळ यांनी सांगितले.
ता.शिरूर जि.पुणे