पुणे : कोरोनाच्या काळात आपण सर्वांनी आरोग्याची काळजी घेतली.असं असलं तरी आपल्याला पाण्याचे आरोग्याचे महत्त्व हे सर्वसामान्यांपर्यंत पोहोचवायचे आहे.पंचायत समितीच्या ज्या काही योजना असतील त्या खऱ्या अर्थाने सर्वांपर्यंत पोहोचवण्याचे काम हे अंगणवाडी सेविका करत आहेत. त्यामुळे पंचायत समितीच्या ब्रँड अँम्बेसिडर जर कोण असतील तर त्या या अंगणवाडी सेविका आणि मदतनीस आहेत असे गौरवोद्गार माजी राज्यमंत्री तथा इंदापूरचे आमदार दत्तात्रय भरणे यांनी काढलेत.
शुक्रवार दि.०२ सप्टेंबर रोजी एकात्मिक बाल विकास सेवा योजना प्रकल्प इंदापुर 1 व 2 पंचायत समिती इंदापुर यांचे संयुक्त विद्यमाने आयोजित कार्यक्रमात आमदार भरणे बोलत होते. दरम्यान एकात्मिक बाल विकास सेवा योजना प्रकल्प इंदापुर 1 व 2 पंचायत समिती इंदापुर यांचे संयुक्त विद्यमाने इंदापूर पंचायत समिती आवारात उभारण्यात आलेल्या "सही पोषण देश रोशन सेल्फी पॉईंट" चे उद्घाटन माजी सार्वजनिक बांधकाम राज्यमंत्री व आमदार दत्तात्रय भरणे यांच्या शुभहस्ते फित कापून करण्यात आलयं. भरणे म्हणाले की, यांचे अनेक प्रश्न आहे भविष्यात ते प्रश्न मार्गी लावण्यासाठी माझे प्रयत्न असतील.मी केवळ आश्वसने देत नाही तर हाती घेतलेले काम तडीस नेतो.कोरोनाच्या काळात इच्छा असून ही तुम्हाला मदत करता येत नव्हती.आज राज्याचा महिन्याचा जीएसटी पंचीसहजार कोटी रूपये च्या आसपास आहे, जो आम्ही मंत्री झालो तेव्हा शून्य होता.राज्याला तीन मार्गाने उत्पन्न मिळते आज हे सर्व मार्ग सुरळीत आहेत मात्र कोरोना काळात त्यातून मिळणारं उत्पन्न शून्याच्या घरात होतं.जेव्हा तुमचा मामा मंत्री होता तेव्हा शासनाच्या तिजोरीत शून्य रुपये होते आता या सरकारच्या काळात महिन्याला जवळपास तीस कोटी हजार कोटी शासनाच्या तिजोरीत जमा होताहेत.जरी मी खुर्चीवर असलो आणि नसलो तरी हा तुमचा मामा आहे.त्यामुळे अंगणवाडी सेविका मदतनीस यांनी अधिक चिंता करु नये असं ते म्हणाले.भरणे कुटुंबांने दिली रक्षाबंधनाची अनोखी भेट - स्वतः आमदार भरणे यांनी केली खरेदी. मागील पंधरा दिवसापूर्वीच राखीपोर्णिमा झाली आहे.मात्र माझ्या आईचं निधन झाल्यानं मी कोणास भेटू शकलो नाही.मात्र असं असलं तरी हा तुमचा मामा कायम सुख सुखदुःखात सोबत आहे.त्यामुळे तुम्हाला कधीही मोकळ्या हाती जावू देणार नाही असं म्हणत आमदार दत्तात्रय भरणे यांनी भरणे कुटुंबियांकडून भगवानराव भरणे प्रतिष्ठान माध्यमातून इंदापूर तालुक्यातील ८५० अंगणावाडी सेविका आणि मदतनीस यांना माहेरची भेट म्हणून साडीचोळी दिली.आमदार दत्तात्रय भरणे यांनी स्वतः बारामती येथील मुक्ताई टेक्स्टाईल मध्ये जावून आपल्या लाडक्या भगिणींनसाठी साड्या खरेदी केल्या आहेत.
गटविकास अधिकारी विजयकुमार परिट म्हणाले की,सन २०१८ मध्ये पंतप्रधान कार्यालयाचा महत्वपुर्ण कार्यक्रम म्हणून महिला व बालविकास विभाग अंतर्गत पोषण अभियान कार्यक्रमाची सुरवात करण्यात आलेली आहे. या कार्यक्रमाअंतर्गत महिला व बालकांचे आरोग्य आणि पोषण स्थितीमध्ये सुधारणा घडवून आणण्याच्या दृष्टीने विविध कार्यक्रमाचे आयोजन करण्यात येते. सदर कार्यक्रम यशस्वी राबविणेकरीता शासनाच्या इतर विभागामध्ये समन्वय व अभिसरण राखण्याचे दृष्टीने ग्रामपंचायत व तालुकास्तरावर नियोजन करून कार्यक्रम राबविले जातात. जनजागृती घडवून आणण्यासाठी याचाच एक भाग म्हणून इंदापूर पंचायत समितीमध्ये पोषण सेल्फी पॉईंट उभारण्यात आला आहे.
यावेळी इंदापूर पंचायत समितीचे गटविकास अधिकारी विजयकुमार परीट,सहा.गटविकास अधिकरी डाॅ.राम शिंदे, बालविकास प्रकल्प अधिकारी संदीप काळे,बालविकास प्रकल्प अधिकारी अमोल मेरगळ,विस्तार अधिकारी सचिन धापटे,पुणे जिल्हा नियोजन मंडळाचे माजी सदस्य सचिन सपकळ,कार्याध्यक्ष अतुल झगडे,माजी पंचायत समिती सदस्य सतिश पांढरे,सरडेवाडीचे सरपंच सिताराम जानकर यांसह सर्व पर्यवेक्षिका,अंगणवाडी सेविका उपस्थित होत्या.
एन टीव्ही न्यूज साठी प्रतिनिधी पल्लवी चांदगुडे इंदापूर पुणे