पुणे : शिरूर तालुक्यातील शिक्रापूर – हिवरे रस्ता दुरूस्तीच्या कामास सुरूवात करण्यात आली आहे. शिक्रापूर ग्रामपंचायतीच्या सदस्या पुजा दिपकराव भुजबळ यांनी ही माहिती दिली.रस्ता दुरूस्तीच्या कामाची माहिती देताना ग्रामपंचायत सदस्या पुजा भुजबळ यांनी सांगितले की, शिक्रापूर येथील पाबळ चौकातून हिवरे गावाकडे जाणा-या रस्त्याची मोठ्या प्रमाणात दुरवस्था झाली होती. या रस्त्याच्या दुरूस्तीच्या कामास तातडीने सुरूवात व्हावी अशी मागणी ग्रामपंचायत सदस्या पुजा भुजबळ यांनी शिरूर हवेली तालुक्याचे आमदार ऍड. अशोक पवार यांच्याकडे करून पाठपुरावा केला होता.त्यानुसार हिवरे रस्ता दुरूस्तीच्या कामास सुरूवात करण्यात आल्याचे ग्रामपंचायत सदस्या पुजा भुजबळ यांनी सांगितले.

सदर रस्त्याचे काम चालू असल्यामुळे वाहनचालकांनी पर्यायी रस्त्याचा वापर करावा. तसेच पर्यायी रस्त्यावर शाळेतील विद्यार्थी ,नागरिक यांची ये-जा असल्यामुळे वाहनचालकांनी जबाबदारीने वाहन चालवावे,वाहतुककोंडी होणार नाही याची दक्षता घ्यावी असे आवाहन ग्रामपंचायत सदस्या पुजा भुजबळ यांनी केले आहे.दरम्यान, शिरूर तालुक्यातील शिक्रापूर – हिवरे कुंभार रस्त्याची दुरूस्ती करण्याची कार्यवाही करण्याबाबत खासदार डॉ.अमोल कोल्हे यांनीही सार्वजनिक बांधकाम विभागाचे कार्यकारी अभियंता अनिल ढेपे यांना १५/०७/२०२२ रोजी निवेदन पत्राद्वारे आदेश दिले होते.