पुणे : बारामती शहरामध्ये निर्भय पथका मार्फत बारामती पोलीस स्टेशन हद्दीमध्ये तसेच जिथे जास्त रहदारी आहे आणि मुख्य चौकांमध्ये बिनधास्त फिरणाऱ्या व बेकायदेशीर वाहन चालकांवरती दंडात्मक कारवाई करण्यात आली आहे.
विद्या प्रतिष्ठान कॉलेज परिसर सीसी कॉर्नर ,अभिमन्यू कॉर्नर, संदीप कॉर्नर, विद्या प्रतिष्ठान मेन गेट समोर तसेच पेन्सिल चौक या ठिकाणी पेट्रोलिंग करून बेशिस्त वाहन चालवणाऱ्या वाहन चालकांवरती दंडात्मक कारवाई करण्यात आलेली आहे.तसेच कोणत्याही प्रकारचे लायसन नसणारे, ट्रिपल सीट आणि वाहन चालवत असताना मोबाईल संभाषण चालू असणाऱ्यांवरती मोठ्या प्रमाणात गुन्हे दाखल करण्यात आलेले आहेत.अशा एकूण 27 गुन्हे दाखल करून एकूण दंड 35 हजार रुपये वसूल करण्यात आलेला आहे.बारामतीतील सदर कारवाई ही उपविभागी पोलीस अधिकारी गणेश इंगळे यांच्या मार्गदर्शनाखाली निर्भय पथक अमृता भोईटे आणि त्यांच्या सहकाऱ्यांनी केलेली आहे.
एन टीव्ही न्यूज साठी प्रतिनिधी पल्लवी चांदगुडे बारामती पुणे