पुणे : बारामती शहरातील नटराज नाट्यकला मंडळाच्या नटराज कलादालनाचा आणि बारामती गणेश फेस्टिव्हल च्या उद्घाटनाचा कार्यक्रम अजित दादा पवार यांच्या हस्ते करण्यात आला.कार्यक्रमांमध्ये अजित दादांचा सत्कार किरण गुजर यांनी केला आहे. तसेच मराठी कलाकार भरत जाधव यांचा सत्कार विरोधी पक्ष अजित दादा पवार यांनी केला.
बारामती शहरामध्ये अनेक प्रकारच्या सोयी सुविधांचा विकास होत आहे पण त्याचबरोबर संस्कृती कलेचा विकास पण महत्त्वाचा आहे, नटराज कलादालनाच्या माध्यमातून बारामतीच्या वैभवात भर पडली आहे.बारामती करांना कलाविष्कार अनुभवता येणार आहेत असे पवार सांगत होते. वी मोरोपंतांचा वारसा लाभलेल्या बारामती मध्ये सांस्कृतिक वैभव वाढवण्याचे काम अनेक सेवाभावी संस्था अनेक कार्यकर्ते करत आहेत, आणि असाच कलेचा वारसा परंपरेने पुढे जाईल असे अजितदादा आपल्या वक्तव्यात सांगत होते.या कार्यक्रमांमध्ये मोठ्या संख्येने पदाधिकारी, अधिकारी, कर्मचारी वर्ग, प्रतिष्ठित नागरिक, पत्रकार बांधव तसेच अनेक कलाकार मोठ्या संख्येने उपस्थित होते.
एन टीव्ही न्यूज साठी प्रतिनिधी पल्लवी चांदगुडे बारामती पुणे