पुणे : शिरूर तालुक्यातील टाकळी हाजी येथील एका शेतक-याच्या राहात्या घराच्या खोलीचा लॉकचा कोयंडा तोडून अनोळखी चोरट्याने सोन्याचे दागिने,रोख रकमेसह २ लाख ६५ हजार रूपयांचा ऐवज लंपास केला.
चोरीच्या या घटनेबाबत टाकळी हाजी ता.शिरूर येथील प्रभाकर बापूराव गावडे वय – ६१ वर्षे, व्यवसाय शेती यांनी शिरूर पोलीस स्टेशनमध्ये फिर्याद दिली. पोलीस सब इन्स्पेक्टर सुनिल उगले ,पोलीस शिपाई विशाल पालवे यांनी या चोरीच्या घटनेसंदर्भात दिलेल्या माहितीनूसार टाकळीहाजी येथील फिर्यादी प्रभाकर बापूराव गावडे यांच्या राहात्या घराच्या खोलीच्या लॉकचा कोयंडा अनोळखी चोरट्याने कशाने तरी तोडून घरात प्रवेश करून घरातील १ लाख ५० हजार रूपये किंमतीचे ३ तोळे वजनाचे सोन्याचे गंठण ,५० हजार रूपये किंमतीचे १ तोळे वजनाचे सोन्याचे कानातील कर्णफुले ,५० हजार रूपये किंमतीचे १ तोळे वजनाचे लहान मुलांचे दागिने, १५ हजार रूपयांची रोख रक्कम असा एकूण २ लाख ६५ हजार रूपयांचा ऐवज दि. १९/०९/२०२२ रोजी साडेसात ते दिनांक २०/०९/२०२२ रोजी साडेसहा वाजण्याच्या सुमारास चोरून नेला. तसेच महादू श्रीपती गावडे यांच्या घराचाही दरवाजाचा कोयंडा कशानेतरी तरी तोडून आत प्रवेश करून चोरी करण्याचा प्रयत्न केला आहे . शिरूर पोलीस स्टेशन व टाकळीहाजी पोलीस दूरक्षेत्राचे पोलीस या चोरीच्या घटनेचा तपास करत आहेत.