शिरूर शहरात दहशत माजवून खंडणी उकळणा-या ६ आरोपींना शिरूर पोलीसांनी गजाआड केले.
अविष्कार संभाजी लांडे वय -२२ रा.सोनारआळी, शिरूर ता.शिरूर जि.पुणे ,अक्षय महेंद्रसिंग परदेशी वय – २३ वर्षे,रा.काचेआळी ,शिरूर ता.शिरूर जि.पुणे, कैलास लक्ष्मण ननवरे वय – २३ वर्षे, रा.रामलिंग ता.शिरूर जि.पुणे, हर्षल मनोहर काळे वय -२२ वर्षे, रा.ढोर आळी,शिरूर ता.शिरूर जि.पुणे, अमोल हेमंत लुनिया वय – २७ वर्षे रा.रामलिंग रोड, शिरूर ता.शिरूर जि.पुणे, अमोल उर्फ दादा अंकुश खिलारे वय -२५ वर्षे रा.लाटेआळी ,शिरूर ता.शिरूर जि.पुणे अशी अटक करण्यात आलेल्या आरोपींची नावे असून त्यांना २०/०९/२०२२ पर्यंत पोलीस कस्टडी रिमांड असल्याची माहिती पोलीस सब इन्स्पेक्टर विक्रम जाधव यांनी दिली.
पोलीस सब इन्स्पेक्टर विक्रम जाधव यांनी याबाबत दिलेल्या माहितीनुसार ,दि.१५/०९/२०२२ रोजी रात्री साडेदहा वाजण्याच्या सुमारास शिरूर येथील मुंबई बाजार येथून शतपावली करीत असलेले अभिषेक ईश्वर गंगावणे वय -२२ वर्षे,रा.मुंबईबाजार शिरूर जि.पुणे यांना सहसिटर रिक्षामधून तलवारी,कोयता,लोखंडी रॉड, लाकडी दांडके घेवून येवून १० लाख रूपयांची खंडणी मागून,मारहाण करून बळजबरी रिक्षामध्ये बसवून अपहरण करून अभिषेक गंगावणे यांना शिरूर येथील दशक्रिया घाट येथे नेऊन विशाल काळे, उमेश जगदाळे, अविष्कार लांडे, अक्षय परदेशी, कैलास ननवरे, देवानंद चव्हाण, हर्षल काळे, रूपेश लुनिया, अमोल लुनिया, दादा खिलारी सर्व रा.शिरूर व दोन अनोळखींनी त्यांच्या गँगसाठी १० लाख रूपयांची खंडणी मागून दहशत निर्माण करून तलवारी, कोयता, लोखंडी रॉड ,लाकडी दांडके व हॉकी स्टिकने अभिषेक ईश्वर गंगावणे यांना जीवे मारण्याचा प्रयत्न करून जखमी केले आहे. त्यानंतर गोपाळ यादव रा.शिरूर याने अभिषेक गंगावणे यांना फोन करून तक्रार दिल्यास जीवे मारण्याची धमकी दिली. त्याबाबत अभिषेक ईश्वर गंगावणे वय -२२ वर्षे रा.मुंबई बाजार ,शिरूर यांनी दिलेल्या फिर्यादीवरून शिरूर पोलीस ठाणे गुन्हा रजिस्टर नं. ६२२/२२ भा.द.वि.कलम ३०७,३६४ (अ) ३८७,३२४,१४३,१४७,१४८,१४९,
३२३,५०४,५०६ भारतीय हत्यार कायदा कलम ४ ,२५ प्रमाणे दाखल आहे.


उर्वरित आरोपींचा शोध घेणेकामी शिरूर पोलीस ठाण्याचे दोन पथक तयार करण्यात आलेले आहेत.
सदर गुन्ह्यातील आरोपींपैकी काही आरोपी हे खुनाच्या गुन्ह्यातून जामीनावर सुटलेले असून त्या आरोपींनी टोळी करून शिरूर शहरामध्ये दहशत निर्माण करून लोकांना खंडणीची मागणी करित असल्याची गोपनीय माहिती मिळत असून आरोपींनी आणखी कोणास खंडणी मागितली असल्यास किंवा खंडणी उकळली असल्यास त्याबाबत शिरूर पोलीस ठाणे येथे तक्रार द्यावी. त्यांचेवर कठोरात कठोर कारवाई करण्यात येईल असेही पोलीस सब इन्स्पेक्टर विक्रम जाधव यांनी सांगितले.
पोलीस अधिक्षक अभिनव देशमुख, अप्पर पोलीस अधिक्षक मितेश गटटे, उपविभागीय पोलीस अधिकारी यशवंत गवारी यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक सुरेशकुमार राऊत, पोलीस सब इन्स्पेक्टर एकनाथ पाटील, पोलीस सब इन्स्पेक्टर अभिजित पवार, पोलीस सब इन्स्पेक्टर विक्रम जाधव सहाय्यक फौजदार नजीम पठाण, सहाय्यक फौजदार गणेश देशमाने, पोलीस नाईक नाथा जगताप पोलीस नाईक बाळू भवर, पोलीस अंमलदार राजेंद्र गोपाळे, विनोद काळे, संतोष साळुंके, प्रविण पिठले, सचिन भोई या पथकाने ही कार्यवाही केली.
प्रतिनिधी :- ता.शिरूर जि.पुणे

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *