• अविनाश देडगांवकर यांच्या ४६ वर्षांच्या निस्वार्थ समाजसेवेची दखल..!
  • श्री गुरु तेज बहादूर साहेब जी यांच्या ३५० व्या शहीद समागमानिमित्त सन्मान..!

अहिल्यानगर प्रतिनिधी | दि. २२ फेब्रुवारी २०२६

अहिल्यानगर: अहिल्यानगर येथील ज्येष्ठ समाजसेवक श्री. अविनाश देडगांवकर यांचा त्यांच्या ४६ वर्षांच्या प्रदीर्घ आणि निस्वार्थ समाजसेवेबद्दल गोविंदपुरा येथील भाई दया सिंहजी गुरुद्वारामध्ये भव्य नागरी सत्कार करण्यात आला. ऊन, वारा, पाऊस याची तमा न बाळगता अहोरात्र सेवा करणाऱ्या देडगांवकर यांच्या कार्याचा गौरव यावेळी करण्यात आला.

आरोग्य व रक्तदान शिबिराचे आयोजन

श्री गुरु तेज बहादूर साहेब जी यांच्या ३५० व्या शहीद समागमानिमित्त गुरुद्वारा भाई दया सिंह जी, गोविंदपुरा येथे भव्य मोफत आरोग्य तपासणी आणि रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले होते. या पवित्र प्रसंगी समाजसेवेतील योगदानाबद्दल देडगांवकर यांचा सन्मान करण्याचे निश्चित करण्यात आले होते.

सन्मानाचे स्वरूप

गुरुद्वाराचे अध्यक्ष बलदेव सिंग यांच्या हस्ते अविनाश देडगांवकर यांचा शाल आणि श्री गुरु तेज बहादूर साहेब यांची चांदीची प्रतिमा देऊन गौरव करण्यात आला. यावेळी देडगांवकर यांच्या सामाजिक कार्याचा उल्लेख करत त्यांच्या पाठीवर कौतुकाची थाप देण्यात आली.

मान्यवरांची उपस्थिती

या सोहळ्याला शहर व परिसरातील अनेक प्रतिष्ठित मान्यवर उपस्थित होते, ज्यात प्रामुख्याने श्री. रवींद्र नारंग, प्रदीप पंजाबी, धीरज नय्यर, अजय पंजाबी, बिट्टू मनोच्या, सतिदर नारंग, हितेश ऑबेराय आणि मनप्रीत धूप्पड यांचा समावेश होता.

समितीवरही महत्त्वपूर्ण निवड

काही दिवसांपूर्वीच अविनाश देडगांवकर यांची अहिल्यानगरमधील लक्ष्मीबाई भाऊराव पाटील माध्यमिक विद्यालयाच्या ‘विद्यार्थी सुरक्षा व भौतिक सुविधा विकास समिती’वर परिवहन वाहतूक मार्गदर्शन सदस्य म्हणूनही निवड करण्यात आली आहे. मुख्याध्यापिका सौ. छाया काकडे यांनी त्यांना हे निवडीचे पत्र प्रदान केले होते.

अविनाश देडगांवकर यांना यापूर्वीही समाजभूषण, समाजरत्न, कोरोना योद्धा, डॉ. बाबासाहेब आंबेडकर आणि महात्मा जोतिबा फुले यांसारख्या अनेक प्रतिष्ठित पुरस्कारांनी सन्मानित करण्यात आले आहे.


वृत्त संकलन: विशेष प्रतिनिधी, एनटीव्ही न्यूज मराठी, अहिल्यानगर.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *