शिरूर तालुक्यातील जातेगाव बुद्रुक येथील व्यंकटेश कृपा शुगर मिल्स लिमिटेड साखर कारखान्याच्या वतीने कोंढापुरी येथील कवठीमळ्यात कारखान्यातील सभासद व हंगाम २०२१-२२ चे ऊस उत्पादक शेतक-यांना साखर वाटप केली जाणार आहे.
दिपावली सणानिमित्त २० रूपये दराप्रमाणे दि.२१/०९/२०२२ ते २२/०९/२०२२ पर्यंत सकाळी ९ ते सायंकाळी ५ यावेळेत कोंढापुरी येथील कवठीमळा येथे साखर वाटप केली जाणार आहे.


सोबत आपले ओळखपत्र घेवून यावे असे आवाहन व्यंकटेश कृपा शुगर मिल्स लि. साखर कारखान्याच्या वतीने करण्यात आले आहे.
प्रतिनिधी :- कोंढापुरी ता.शिरूर जि.पुणे

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *