शिरूर पोलीस स्टेशन,वाहतूक शाखेमार्फत लायसन नसलेल्या,विनाकारण हॉर्न वाजविणा-या ३२ मोटरसायकलस्वारांवर कारवाई करून दंड वसूल करण्यात आला.
पोलीस नाईक राजेंद्र वाघमोडे यांनी ही माहिती दिली.
पोलीस नाईक राजेंद्र वाघमोडे यांनी दिलेल्या माहितीनुसार, शनिवार दि.१७/०९/२०२२ रोजी शिरूर शहरामधील बी.जे कॉर्नर, निर्मल प्लाझा, सिटीबोरा कॉलेज रोड अशा गर्दीचे ठिकाणी मोटरसायकलला नंबर नसणे, नंबर प्लेटवर नाव टाकने, ग्रुपचे नाव लिहिणे अशा मोटरसायकलवर कारवाई करून पोलीस स्टेशनला जमा करण्यात आल्या असून, इतर मोटर सायकल चालकांवर
लायसन नसणे – 5000/- दंड,
ट्रिपल सिट – 1000/- दंड,
विना कारण हॉर्न वाजवणे – 1000/- दंड अशा प्रकारे एकूण 32 मोटर सायकलवर कारवाई करून त्यांच्याकडून तब्बल 65000/- रुपये दंड वसूल करणेत आला आहे

सदरची कारवाई पोलीस निरीक्षक सुरेश कुमार राऊत यांच्या मार्गदर्शना खाली सहाय्यक फौजदार अनिल चव्हाण, पोलीस नाईक राजेंद्र वाघमोडे, महिला पोलीस नाईक भाग्यश्री जाधव, पोलीस अंमलदार शेखर झाडबुके यांनी केलेली आहे.
तसेच यापुढे कॉलेज रोडला विनाकारण फिरणारे मोटर सायकल स्वार व 18 वर्षा खालील वाहन चालकांवर कडक कारवाई करण्यात येणार आहे असे पोलीस नाईक राजेंद्र वाघमोडे यांनी सांगितले.
प्रतिनिधी :- ता.शिरूर जि.पुणे