नांदूर औद्योगिक वसाहत परिसरात अवैध दारू विक्री जोरात;
दौंड तालुक्यातील पश्चिम भागात अवैध्य दारू विक्री तेजीत सुरू असल्याचे दिसून येत आहे. नांदूर परिसरातील कंपन्यासमोर छोट्या-मोठ्या किराणा दुकानांसोबत पत्र्यांचे शेड मध्ये परराज्यातील बनावट दारू साठवून त्याची विक्री केली जात आहे. तसेच देशी विदेशी दारू असे अवैध धंदे करणाऱ्यांमुळे ग्रामीण भागातील नागरिक व्यसनाधीन होत चालले आहेत. नांदूर परिसरात कंपन्यामुळे परराज्यातील मजुरी वर्ग जास्त प्रमाणात असल्यामुळे सहज व स्वस्त दारू उपलब्ध होत असल्यामुळे नागरिक कामधंदे सोडून व्यसनाधीन होत आहेत. अशा अवैध धंदे वाईकांवर कठोर कारवाईची गरज भासत आहे. मात्र संबंधित प्रशासन येथे दुर्लक्ष करत असल्याचे चित्र आहे.

अहोरात्र दारूची विक्री सुरू असून देखील संबंधित प्रशासन डोळेझाक करत असल्याची चर्चा दबक्या आवाजात सुरू आहे. . अशा व्यावसायिकांकडून दर महिन्याला हफ्ता म्हणून रक्कम वसूल करून त्यांना दारू विक्रीची परवानगी देण्यात येत आहे.यामुळे दिवसा ढवळ्या नांदूर येथील कंपन्यासमोर वर केले जाताहेत. अशा या अवैध दारू विक्री मुळे तरुण वर्ग व्यसनाधीन होत चालला आहे. या अवैध दारू विक्री कडे प्रशासन का दुर्लक्ष करत आहे असा सवाल स्थानिक नागरिक करत आहे.