पुणे : शिक्रापूर पोलीस स्टेशन हद्दीतील महाबळेश्वर नगर ,शिक्रापूर येथील वेळनदीच्या पात्रात एका अनोळखी महिलेचे प्रेत मिळून आल्याची माहिती शिक्रापूर पोलीस स्टेशनचे पोलीस नाईक संतोष मारकड यांनी दिली.
अकस्मात मयत नंबर 148/2022 अनोळखी मयत महिलेचे वर्णन : वय अंदाजे ३० ते ३५ वर्षे, नेसणेस राखाडी रंगाचा ब्लाऊज,हिरव्या रंगाचा परकर, लाल रंगाची निकर, कानामध्ये सोन्याची कर्णफुले, गळ्यामध्ये सोन्याचे मणीमंगळसुत्र, नाकामध्ये चमकी, दोन्ही हातामध्ये हिरव्या काचेच्या बांगड्या, व पायामध्ये जोडवे असे मयत अनोळखी महिलेचे वर्णन असल्याचे पोलीस नाईक संतोष मारकड यांनी सांगितले.अशा वर्णनाची महिला आपले पोलीस स्टेशन हद्दीमध्ये मिसिंग असल्यास शिक्रापूर पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक हेमंत शेडगे 9923600017 , सहाय्यक पोलीस निरीक्षक रणजित पठारे 8369079611 यांच्याशी तसेच शिक्रापूर पोलीस स्टेशन 02137- 286333 येथे संपर्क साधण्याचे आवाहन पोलीस नाईक संतोष मारकड यांनी केले आहे.