पुणे : शिरूर तालुक्यातील उरळगाव येथील न्यू इंग्लिश स्कूलमधील विद्यार्थ्यांनी आंबळे ( ता.शिरूर ) येथील महर्षी शिंदे हायस्कूल विद्यालयात विद्यार्थ्यांसमोर प्रात्यक्षिके केली.
आंबळे येथील महर्षी शिंदे हायस्कूलचे मुख्याध्यापक यशवंत शिवाजी शिंदे यांच्या उपस्थितीत ,मुख्याध्यापक शंकर कवळे यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आलेल्या प्रात्यक्षिकांमध्ये एकपाद राजकपोत आसन, पूर्ण उस्ट्रासन, पूर्ण भूजंगासन,पक्षी आसन, सुप्त एकपाद स्कंद आसन , अनंतासन, शीर्षासन,वादी, पद्मासन, विपरीत पद्मासन या प्रात्यक्षिकांचा समावेश होता.
उरळगाव येथील न्यू इंग्लिश स्कूलचे मुख्याध्यापक शंकर तुकाराम कवळे यांनी ही माहिती दिली. दौंड तालुक्यातील वडगाव बांडे येथील आदर्श विद्यालयातील विद्यार्थ्यांसमोरही प्रात्यक्षिके करण्यात आलेली असून २० राष्ट्रीय, ४ आंतरराष्ट्रीय स्पर्धांमध्ये जगभर १४५० प्रात्यक्षिके केली. १९८५ सालापासून प्रात्यक्षिके करत असल्याचे मुख्याध्यापक शंकर कवळे यांनी सांगितले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *