पुणे : शालेय खेळा़डू़ंच्या क्रीडा कौशल्याला वाव देण्यासाठी व भविष्यातील राष्ट्रीय,आंतरराष्ट्रीय खेळाडू निर्माण व्हावेत या उद्देशाने महाराष्ट्र शासनाच्या क्रीडा व युवक सेवा संचालनालयामार्फत जिल्हा क्रीडा परिषद पुणे व जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालय पुणे द्वारा २०२२ -२३ या वर्षात आयोजित करावयाच्या शालेय स्पर्धा आयोजनास राज्यस्तरापर्यंत मान्यता प्रदान करण्यात आलेली आहे.सन २०२२ -२३ या वर्षातील शासकीय शालेय क्रीडा स्पर्धा आयोजन व नियोजनाकामी बैठकीचा कार्यक्रम निश्चित करण्यात आल्याची माहिती पुणे जिल्हा क्रीडा अधिकारी महादेव कसगावडे यांनी पत्राद्वारे पुणे ग्रामीण जिल्ह्यातील सर्व मुख्याध्यापक ,प्राचार्यांना कळविली आहे.तालुकानिहाय स्पर्धा आयोजनपर बैठकीचा कार्यक्रम पुढीलप्रमाणे:-दिनांक :- २८ सप्टेंबर २०२२ रोजी सकाळी ११ वाजता खेड व शिरूर स्थळ :- महात्मा गांधी विद्यालय व कनिष्ठ महाविद्यालय राजगुरुनगर ,खेडदिनांक:- २८ सप्टेंबर २०२२ रोजी दुपारी ३ वाजता जुन्नर व आंबेगाव स्थळ :- गुरूवर्य रा.प.सबनीस विद्यामंदीर नारायणगाव,दिनांक :- २९ सप्टेंबर २०२२ रोजी सकाळी साडेअकरा वाजता महानगर पालिका क्षेत्राबाहेरील हवेली,मावळ व मुळशी तालुका स्थळ :- पी आय सी टी मॉडेल स्कूल म्हाळूंगे ,पुणे,दि.३० सप्टेंबर २०२२ रोजी सकाळी साडेअकरा वाजता बारामती,दौंड व इंदापूर स्थळ:- तुळजाराम चतुरचंद महाविद्यालय बारामती ता.बारामती.१ ऑक्टोबर २०२२ रोजी दुपारी साडेअकरा वाजता भोर ,पुरंदर, वेल्हे स्थळ :- राजा रघुनाथराव विद्यालय भोर सन २०२२-२३ या वर्षात आयोजित विविध क्रीडास्पर्धाबाबत माहिती व चर्चा या बैठका़मध्ये केली जाणार असून ऑनलाईन प्रवेश ,स्पर्धा शुल्क व वेब प्रणाली कामकाजाबाबत या बैठकीत मार्गदर्शन केले जाणार आहे.
तालुकास्तर व जिल्हास्तर शालेय क्रीडा स्पर्धा कार्यक्रम निश्चित करणे ,तालुका, जिल्हा, विभाग राज्यस्पर्धा मागणीपत्रे सादर करणे, क्रीडा विभागाच्या विविध योजना ,उपक्रमाची व क्रीडा मार्गदर्शिकेची माहिती या बैठकीत दिली जाणार असल्याचे पुणे जिल्हा क्रीडा अधिकारी महादेव कसगावडे यांनी पुणे ग्रामीण जिल्ह्यातील सर्व मुख्याध्यापक व प्राचार्यांना कळविलेल्या पत्रात म्हटले आहे.
