पुणे : एग्रीकल्चरल डेव्हलपमेंट ट्रस्ट ही संस्था गेल्या पन्नास वर्षापेक्षा अधिक शिक्षण,पाणी, शेती,आरोग्य प्रशिक्षण, महिला सक्षमीकरण या सामाजिक क्षेत्रामध्ये उल्लेखनीय कार्य करत असल्याचे पाहायला मिळत आहे.
एग्रीकल्चरल डेव्हलपमेंट ट्रस्ट बारामती यांच्यातर्फे शारदा महिला संघ शारदानगर म्हणून कार्यरत असणाऱ्या संस्थेतर्फे म्हसोबाची वाडी गावातील बचत गटातील महिलांना व्यवसायाचे मार्गदर्शन करण्यात आले.
शारदा महिला संघाच्या प्रमुख सुनंदाताई पवार यांच्या मार्गदर्शनाने आज कित्येक महिला उद्योजक असल्याचे आपल्याला पाहायला मिळत आहे. शारदा महिला संघ शारदानगर विभाग प्रमुख बाळासाहेब नगरे तसेच शारदा महिला संघ शारदानगर बारामती तालुका समन्वय प्रकाश साळुंखे यांनी महिलांना बचत व उद्योग व्यवसाय ही काळाची गरज कशी आहे. तसेच उद्योग व्यवसाय उभा करू इच्छिणाऱ्या महिलांना मार्गदर्शन केले. अनेक प्रकारच्या व्यवसायाचे मार्गदर्शन करण्यात आले आहे. तसेच उद्योग सुरू करायचा म्हटलं की पैसे लागणारच त्यासाठी भाग भांडवल या स्वरूपात गटातील महिलांना कर्ज उपलब्ध करून देऊन महिला कशा सक्षम होऊ शकतात या दृष्टीने शारदा महिला संघाची वाटचाल चालू आहे.
सुनंदाताई पवार यांच्या मार्गदर्शनाखाली शारदा महिला संघा तर्फे इंदापूर तालुक्यातील सर्व महिलांसाठी मोफत सर्व रोग निदान आरोग्य शिबिराचे आयोजन शुक्रवारी 7 ऑक्टोंबर 2022 रोजी स्थळ छत्रपती हॉस्पिटल भवानी नगर येथे आयोजन करण्यात आले आहे. री इंदापूर तालुक्यातील सर्व महिलांनी याचा लाभ घ्यावा अशी विनंती शारदा महिला संघाचे विभाग प्रमुख बाळासाहेब नगरे यांनी महिलांना सांगितले आहे या कार्यक्रमासाठी शारदा महिला संघ शारदा नगर विभाग प्रमुख बाळासाहेब नगरे तसेच शारदा महिला संघ शारदानगर बारामती तालुका समन्वय प्रकाश साळुंखे उपस्थित असून म्हसोबाची वाडी मधील मोठ्या संख्येने महिला कार्यक्रमासाठी उपस्थित होत्या.
एन टीव्ही न्यूज साठी प्रतिनिधी पल्लवी चांदगुडे बारामती पुणे