पुणे : विहीरींवरील मोटारची चोरी करणा-या दोघा आरोपींना रांजणगाव एम आय डी सी पोलिसांनी अटक केली.ज्ञानेश्वर नंदू भोसले रा.ढोकसांगवी ता.शिरूर जि.पुणे, सिद्धांत विलास वायदंडे रा.वडनेर बुद्रूक ता.पारनेर जि.अहमदनगर अशी याप्रकरणी अटक केलेल्या आरोपींची नावे असून त्यांच्याकडून दोन मोटार जप्त करण्यात आल्या. ढोकसांगवी ता.शिरूर येथील शेतकरी आनंदा भानुदास गोरडे यांनी फिर्याद दिल्याने आरोपींविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला .तपास अधिकारी पोलीस नाईक अमित चव्हाण व राजेंद्र ढगे यांनी दिलेल्या माहितीनुसार , रांजणगाव एम आय डी सी पोलीस स्टेशन हद्दीतील मौजे ढोकसांगवी ते निमगाव भोगी रोडलगतच्या कॅनॉल जवळून दिनांक २५/०९/२०२२ रोजी दुपारी दीड वाजण्याच्या सुमारास दोन इसम संशयितरित्या मिळून आल्याने त्यांच्याकडे शेतक-यांनी चौकशी करत आजूबाजूला पाहणी केली असता काही अ़ंतरावर एक पाण्याची मोटार पडलेली दिसली.त्यावेळी जमलेल्या शेतक-यांनी त्यांना पकडण्याचा प्रयत्न केला असता त्यांच्यापैकी एक इसम पळून गेला. एकास ताब्यात घेवून रांजणगाव एम आय डी सी पोलीसांच्या ताब्यात दिले. याप्रकरणी शेतकरी आनंदा भानुदास गोरडे रा.ढोकसांगवी ता.शिरूर जि.पुणे यांनी फिर्याद दिल्याने आरोपींविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला.ताब्यात घेतलेला आरोपी ज्ञानेश्वर नंदू भोसले रा.ढोकसांगवी ता.शिरूर जि.पुणे याच्याकडे सखोल तपास केला असता त्याचा साथीदार सिद्धांत विलास वायदंडे रा. वडनेर बुद्रूक ता.पारनेर जि.अहमदनगर हा असल्याचे निष्पन्न झाले.तपास पथकातील सहाय्यक फौजदार दत्तात्रय शिंदे, पोलीस नाईक राजेंद्र ढगे, प़ोलीस कॉन्स्टेबल उमेश कुतवळ,विजय शिंदे यांनी पळून गेलेल्या आरोपीचा शोध घेवून त्यास अटक केली.
प़ोलीस अटकेत असणा-या दोन्ही आरोपींनी अशाच प्रकारच्या आणखी विहीरी़ंवरील मोटारची चोरी केली असल्याची कबुली दिली आहे.त्यांच्याकडून दोन मोटार जप्त करण्यात आलेल्या असून त्यांच्याविरूद्ध दोन वेगवेगळे गुन्हे दाखल करण्यात आलेले आहेत.पोलीस अधिक्षक पुणे ग्रामीण अभिनव देशमुख, अप्पर पोलीस अधिक्षक मितेश गट्टे, शिरूर विभागाचे उपविभागीय पोलीस अधिकारी यशवंत गवारी यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक बलवंत मांडगे , पोलीस उपनिरीक्षक सुहास रोकडे, सहाय्यक फौजदार दत्तात्रय शिंदे, पोलीस कॉन्स्टेबल विजय शिंदे,उमेश कुतवळ, पोलीस नाईक अमित चव्हाण, पोलीस नाईक राजेंद्र ढगे, पोलीस हवालदार विलास आंबेकर यांनी ही कामगिरी केली. पोलीस नाईक अमित चव्हाण व राजेंद्र ढगे या गुन्ह्याचा पुढील तपास करत आहेत.
